Share

“अमोल मिटकरींचा इतिहास कच्चा”, Atul Bhatkhalkar यांचा निशाणा

by MHD
Atul Bhatkhalkar criticizing Amol Mitkari

Atul Bhatkhalkar । आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी नुकतीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) सैन्यामध्ये असणाऱ्या मुस्लिम सैन्याच्या नावांची यादी सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यांच्यावर आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम हिंदू धर्म, हिंदू संस्कृतीसाठी काम केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मच या देशातील मुघल आक्रमण संपवण्यासाठी झाला होता. अमोल मिटकरींचा इतिहास कच्चा आहे,” असा दावा अतुल भातखळकर यांनी केला आहे.

“काही लोक खोटा इतिहास पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. रायगडावर मशीद बांधली होती, असल्या ब्रिगेडी इतिहासकारांना आम्ही भीक घालत नाही. अबू आझमीला बडगा मिळाल्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वाहणारे ट्विट केले,” असे भातखळकर म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, “मुळात कोणतेही लाऊडस्पीकर खाली केले नाहीत. मशिदीवरच्या भोंग्याचा प्रश्न मी उपस्थित केला असून आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) मतपेढीला धोका पोहोचल्याने ते खोटे आरोप करत आहेत,” असा दावा भातखळकर यांनी केला.

Atul Bhatkhalkar statement about Sudhir Mungantiwar

आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या नाराजीच्या चर्चांवर त्यांनी वक्तव्य केले. “काही नसताना सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजीच्या बातम्या चालवल्या जात आहेत. त्या संदर्भात त्यांनी या गाण्याचा उल्लेख केला. चुकीच्या बातम्या करणे योग्य नाही,” असे देखील भातखळकर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या :

Atul Bhatkhalkar has described Amol Mitkari history as raw.

Politics Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now