Share

“मुंडे 302 च्या गुन्ह्यात आले नाही तर सरकार…” Manoj Jarange Patil यांनी दिला इशारा

Manoj Jarange Patil, while speaking to the media once again, has targeted Dhananjay Munde over the Santosh Deshmukh murder case.

by MHD

Published On: 

Manoj Jarange Patil target Dhananjay Munde in Santosh Deshmukh murder case

🕒 1 min read

Manoj Jarange Patil । मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून (Santosh Deshmukh murder case) राज्याचे वातावरण मागील काही दिवसांपासून तापले असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे.

“धनंजय मुंडे(Dhananjay Munde) 100 टक्के 302 च्या गुन्ह्यात असतील. जर धनंजय मुंडे 302 च्या गुन्ह्यात आले नाही तर सरकार संशयाच्या भोवऱ्यात येईल. इतकेच नाही तर मुंडे पुरवणी जबाबामध्ये येणार,” असा खळबळजनक दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

बीड जिल्ह्यातील व्हायरल होत असलेल्या मारहाणीच्या व्हिडिओवरूनही त्यांनी भाष्य केले आहे. “संतोष देशमुख हत्याप्रकरणामधून लक्ष विचलित करण्यासाठी एकमेकांचे व्हिडिओ बाहेर काढले जात आहेत. कार्यकर्त्यांचे व्हिडिओ काढून राजकीय डाव टाकला जातोय,” असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.

“राजकारणी लोक जर एखाद्या प्रकरणामध्ये शिरली तर सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला अडचणी येतात. एखादे प्रकरण दाबण्यासाठी असे व्हिडिओ बाहेर काढले जातात, त्यामुळे सामाजिक प्रश्न बाजूला राहत आहेत,” असे जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Patil on Santosh Deshmukh murder case

पुढे ते म्हणाले की, “लोकांनी सावध होणे गरजेचे आहे. सामाजिक प्रश्न सोडवत असताना आपण कायम गोरगरिबांच्या एकजुटीने उभे राहिले पाहिजे. संतोष देशमुख प्रकरण आम्ही मागे पडू देणार नाही. मराठा समाजाने आपल्या प्रश्नावरून लक्ष केंद्रित करावे,” असा सल्लाही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Marathi News Maharashtra Politics

Join WhatsApp

Join Now
by MHD

🕘 संबंधित बातम्या