Dattatray Gade । स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरूणीवर अत्याचार (Swarget rape case) केल्याप्रकरणी काल आरोपी दत्तात्रय गाडे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याची रवानगी येरवडा तुरुंगात झाली आहे.
दत्तात्रय गाडेवर कारवाई झाल्यानंतर आता त्याचे वकील सुमित पोटे (Sumit Pote) अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गाडे याने तरुणीवर बळजबरी केली नसून त्यांचे सहमतीने संबंध झाले. तिने गाडेकडून साडेसात हजार रुपये घेतले, असा दावा सुमित पोटे यांनी केला होता.
परंतु, काल पोटे यांनी न्यायालयासमोर साडेसात हजार रुपयांचा कोणता युक्तिवाद झाला नसल्याची कबुली दिली. न्यायालयासमोर युक्तिवाद संपल्यानंतर गाडे याने ही माहिती आम्हाला दिली होती आणि त्यावरून आम्ही माध्यमांशी बोललो, असेही पोटे म्हणाले.
यामुळे पोटे यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता पीडितेबद्दल खोटी माहिती देणाऱ्या संतप्त वकिलावर कारवाई होणार का? असा सवाल आता उपस्थित होत असल्याचा पाहायला मिळत आहे.
Action likely to be taken against Dattatray Gade lawyer Sumit Pote
दरम्यान, अत्याचाराच्या घटनेदिवशी दत्तात्रय गाडे याच्याजवळ असणारा फोन अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलीस त्याच्या फोनचा शोध घेत आहेत. दत्तात्रय गाडे याचा हा फोन सापडला तर त्याच्याबद्दल आणखी महत्त्वाचे पुरावे समोर येऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या :