Share

Dattatray Gade ला पुन्हा कोर्टाचा दणका, ‘इतक्या’ दिवसांसाठी होणार येरवडा कारागृहात रवानगी

After Dattatray Gade arrest, many of his exploits have come to light. Now, he has been given a shock by the court.

by MHD

Published On: 

Dattatray Gade remanded in Judicial custody for 14 days

Dattatray Gade । 25 फेब्रुवारी रोजी स्वारगेट बस स्थानकाच्या आवारात शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर दत्तात्रय गाडे हा अत्याचार (Pune Rape Case) करून पळून गेला होता. पोलिसांनी त्याला त्याच्याच गुनाट गावातून ताब्यात घेतले. आज त्याची पोलीस कोठडी संपली होती.

त्यामुळे त्याला कोर्टात हजर केले होते. यावेळी त्याला कोर्टाकडून मोठा धक्का बसला आहे. दत्तात्रय गाडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता त्याची रवानगी येरवडा तुरुंगात होणार आहे. हा गाडेसाठी मोठा झटका मानला जात आहे.

दत्तात्रय गाडेला अटक केल्यांनंतर त्याचे अनेक कारनामे समोर आले आहेत. संबंधीत तरुणीवर अत्याचार केले नसून आमचे सहमतीने संबंध झाल्याचा दावा गाडे आणि त्याच्या वकिलांनी केला होता. यामुळे तपासाला नवीन दिशा मिळेल असे वाटत होते.

पण पोलिसांनी याचा सखोल तपास केला. तपासादरम्यान दत्तात्रय गाडे आणि पीडित तरुणी संपर्कात नव्हते अशी माहिती तपासातून समोर आली होते. गाडेनं तरुणीला 7500 रुपये दिल्याचा केलेला दावाही खोटा ठरला होता.

Dattatray Gade remanded in Judicial custody

इतकेच नाही तर गाडेने आजवर अनेक महिला आणि युवतींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती देखील समोर आले आहे. शिरुर परिसरात तो एका लॉजबाहेर बसून महिलांचे छुपे व्हिडिओ काढून त्यांचा गैरफायदा घेत असल्याचे तपासात समोर आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही