Swargate rape case । पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात उभ्या असणाऱ्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी 70 तासांमध्ये आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) याला अटक केली होती. (Pune Rape Case)
या संपूर्ण प्रकरणामुळे एसटी प्रशासनावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. सध्या या प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे. अशातच आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
स्वारगेट बलात्कार प्रकरणी हयगय केल्याप्रकरणी एसटी प्रशासनाच्या आठ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, यामध्ये प्रादेशिक व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रक यांचा समावेश आहे.
दरम्यान, काल पुणे पोलिसांकडून तज्ज्ञांच्या उपस्थितीत बसमधील आवाजाची चाचणी करण्यात आली. शिवशाही बस वातानुकूलित असल्याने काचा बंद होत्या. त्यामुळे पीडित तरुणीचा आवाज बाहेर ऐकू आला नाही अशी धक्कादायक माहिती चाचणीत समोर आली आहे.
Pune Rape Case police found new evidence
तपासाच्या दृष्टीने ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. पोलीस आता दत्तात्रय गाडे याच्याविरुद्ध मजबूत पुरावे सादर करताना या निष्कर्षाचा वापर करू शकतात. यामुळे दत्तात्रय गाडे याच्या अडचणी वाढू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या :