Chitra Wagh । अधिवेशनात भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आणि ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांच्यात वाद निर्माण झाला होता. याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले असल्याचे पाहायला मिळत आहे.
याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांनी चित्रा वाघ आणि भाजपवर निशाणा साधला आहे. “चित्रा वाघ यांनी माझ्यावेळी 1760 चा आकडा सांगितला होता. मेहबूब शेख सारखे 1760 तंगड्याला बांधून फिरते, असे त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या. आता अनिल परब आहेत,” असे मेहबूब शेख म्हणाले.
“चांगल्या घरातील महिला कमरेखालची भाषा बोलू शकते का? ऐकायला तरी चांगले वाटेल का? भाजपला (BJP) लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बाईला आमदार करायला लागले याचे दुर्दैव आहे,” असे देखील मेहबूब शेख म्हणाले.
पुढे मेहबुब शेख म्हणाले की, “काही लोकांच्या तोंडाची गटारगंगा उघडली की घाणच बाहेर येते. तसेच या लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बाईचे आहे. अशा लोकाना आमदार केले तर सभागृहाचे पावित्र्य राहणार नाही,” असा टोला मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांना लगावला आहे.
Mehboob Shaikh on Chitra Wagh and BJP
दरम्यान, मेहबूब शेख यांनी भाजप आणि चित्रा वाघ यांच्यावर अतिशय बोचरी टीका केली आहे. मेहबूब शेख यांच्या टीकेला चित्रा वाघ आणि भाजप काय प्रत्युत्तर देणार? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :