KKR vs RCB । इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असून यंदाच्या हंगामात या लीगला आजपासून सुरुवात होणार आहे. आयपीएल 2025 चा (IPL 2025) पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bangalore) यांच्यात होणार आहे.
पहिलाच सामना कोणता संघ जिंकणार? याकडे दोन्ही संघांच्या खेळाडूंचे विशेष लक्ष लागले आहे. पण आज पावसाची 90 टक्के शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जर पाऊस पडला तर हा सामना रद्द होऊ शकतो.
या दोन्ही संघांबद्दल बोलायचे झाले तर दोन्ही संघ यापूर्वी 35 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) 21, तर आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) 14 सामन्यात विजय मिळवला आहे. यंदा या सामन्यामध्ये दोन्ही संघामध्ये मोठा बदल केला आहे. आजचा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेक सामना सुरू होण्याच्या अर्धा तास अगोदर होईल.
RCB and KKR IPL 2025 Match Where To Watch On TV?
RCB आणि KKR च्या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे.
RCB and KKR IPL 2025 Match Live Streaming Details
RCB आणि KKR चे सर्व सामने डिस्ने+हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीम केले जाणार आहेत.
RCB Squad For IPL 2025
रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, जोश हेझलवूड, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन, रसिक दार, सुयश शर्मा, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, नुवान थुशारा, मनोज बंडल, मनोज बंधू, जॉब, बिनबुड, स्व. चिकारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी.
KKR Squad For IPL 2025
अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, क्विंटन डी कॉक, रहमानउल्ला गुरबाज, अंगकृष रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रमणदीप सिंग, आंद्रे रसेल, ॲनरिक नोर्टजे, हर्षित राणा, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा, मयंक जॉन मार्केन्सन, मयंक पानवडे, मानिश रोंडे, पो. लवनीथ सिसोदिया, अनुकुल रॉय, मोईन अली, चेतन सकरिया
महत्त्वाच्या बातम्या :