🕒 1 min read
बंगळुरू– रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चे चाहते ‘ई साला कप नामदे’ म्हणत असतानाच त्यांच्यावर आभाळ कोसळलंय. WPL 2026 च्या हंगामाला अवघे काही दिवस उरले असतानाच एका मोठ्या बातमीने क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. आरसीबीची ‘क्वीन’ आणि गतविजेतेपदाची शिल्पकार एलिस पेरी (Ellyse Perry) हिने वैयक्तिक कारणास्तव आगामी हंगामातून माघार घेतली आहे. पेरीसोबतच दिल्ली कॅपिटल्सची स्टार अॅनाबेल सदरलँड (Annabel Sutherland) आणि यूपी वॉरियर्सची तारा नॉरिस (Tara Norris) यांनीही स्पर्धेतून अंग काढून घेतल्याने फ्रँचायझींचे धाबे दणाणले आहेत.
WPL 2026: Ellyse Perry OUT
९ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या लीगला शेवटच्या क्षणी हे धक्के बसले आहेत. पेरीने आरसीबीसाठी आतापर्यंत २५ सामन्यांत ९७२ धावा आणि १४ विकेट्स घेत एकहाती सामने जिंकून दिले होते. अशा हुकमी एक्क्यानेच साथ सोडल्याने स्मृती मानधनाच्या टीमचं टेन्शन चांगलंच वाढलंय.
पेरीची जागा कोण घेणार?
पेरीसारख्या आंतरराष्ट्रीय स्टारच्या जागी आरसीबीने भारतीय अष्टपैलू सायली सातघरे (Sayali Satghare) हिची निवड केली आहे. सायलीला ३० लाख रुपयांच्या किमतीत संघात समाविष्ट करण्यात आले आहे. सायलीने गेल्या हंगामात गुजरात जायंट्सकडून खेळताना ४ सामन्यांत १ विकेट घेतली होती.
दिल्ली आणि यूपीलाही फटका
दिल्ली कॅपिटल्सची अॅनाबेल सदरलँड देखील वैयक्तिक कारणामुळे खेळणार नाही. तिच्या जागी दिल्लीने ६० लाख रुपये मोजून ऑस्ट्रेलियाची अनुभवी लेग स्पिनर अलाना किंग (Alana King) हिला करारबद्ध केले आहे.
दुसरीकडे, यूपी वॉरियर्सची तारा नॉरिस नेपाळमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप क्वालिफायरसाठी अमेरिकेच्या राष्ट्रीय संघात गेल्याने ती डब्ल्यूपीएलला मुकणार आहे. तिची जागा भरून काढण्यासाठी यूपीने ऑस्ट्रेलियाच्या अनकॅप्ड अष्टपैलू चार्ली नॉट (Charli Knott) हिच्यावर १० लाखांचा जुगार खेळला आहे. ऐनवेळी झालेल्या या बदलांमुळे संघांचे गणित बिघडले असून, आता हे नवीन चेहरे कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष असेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- “एका खेळाडूला सांभाळू शकत नाही, अख्खी टीम काय…”; बांगलादेशने बीसीसीआयची ‘इज्जत’ काढली, थेट वर्ल्ड कपवर बहिष्कार?
- “गंभीरला वेळ नसेल तर लक्ष्मणला आणा…”; शुभमन गिल आक्रमक, बीसीसीआयसमोर मांडली ‘ही’ मोठी अट!
- धावपळ जिवावर बेतली! ‘ऑरेंज कॅप’ विनर साई सुदर्शनला गंभीर दुखापत; विजय हजारे ट्रॉफीतून बाहेर, IPL खेळणार का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










