🕒 1 min read
अहमदाबाद – एका धावेसाठी क्रिकेटपटू काय काय करू शकतात, याचा प्रत्यय नुकताच अहमदाबादच्या मैदानात आला. पण ही एक धाव भारताचा युवा स्टार बॅटर साई सुदर्शन (Sai Sudharsan) याला चांगलीच महागात पडली आहे. धाव पूर्ण करण्यासाठी मारलेली एक डायव्ह (Dive) त्याच्या इतकी अंगलट आली की, त्याला आता थेट रुग्णालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. बरगडीला फॅक्चर झाल्यामुळे साई सुदर्शनला विजय हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hazare Trophy) उर्वरित हंगामातून बाहेर पडावे लागले आहे.
नेमकं काय घडलं?
अहमदाबादमध्ये तामिळनाडू आणि मध्य प्रदेश यांच्यात एलिट ग्रुप अ चा सामना सुरू होता. धाव घेण्यासाठी साईने जीवाचा आकांता करून डायव्ह मारली, पण यातच त्याच्या उजव्या बाजूच्या सातव्या बरगडीला दुखापत झाली. वैद्यकीय तपासणीत ‘हेअरलाईन फ्रॅक्चर’ (Undisplaced Fracture) झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तामिळनाडूची मोहीम आधीच अडखळत सुरू असताना, आता त्यांचा हा हुकमी एक्का स्पर्धेबाहेर गेल्याने संघाला मोठा धक्का बसला आहे.
सध्या साई सुदर्शन बेंगळुरूमध्ये बीसीसीआयच्या (BCCI) ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये उपचार घेत आहे. त्याची दुखापत गंभीर असली तरी तो वेगाने सावरतोय. पुढील ७ ते १० दिवसांत तो वरच्या शरीराचा (Upper Body) व्यायाम सुरू करेल. बीसीसीआयच्या रिपोर्टनुसार, तो रणजी ट्रॉफीच्या काही सामन्यांसाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे IPL 2026 साठी पूर्णपणे फिट होईल.
गुजरात टायटन्सचं टेन्शन वाढलं होतं?
साई सुदर्शन हा गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) कणा मानला जातो. गेल्या हंगामात त्याने ‘ऑरेंज कॅप’ जिंकून आपण काय चीज आहोत हे दाखवून दिलं होतं. त्यामुळे त्याच्या दुखापतीची बातमी येताच गुजरातच्या गोटात नक्कीच चिंतेचे वातावरण होते. पण आता तो आयपीएलपूर्वी फिट होणार असल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘बांगलादेश म्हणजे पाकिस्तान नव्हे…’; मुस्तफिजुरच्या ‘एक्झिट’वरून शशी थरूर भडकले, बीसीसीआयला सुनावले खडे बोल!
- ६, ६, ६, ६, ६, ४… हार्दिक पांड्याचं चक्रीवादळ! ६ चेंडूत ३४ धावा कुटल्या, पण चाहत्यांसाठी एक ‘बॅड न्यूज’
- “तुमच्यात हिंमत आणि मर्दानगी असेल तर…”; ठाण्याच्या ‘त्या’ व्हिडिओवरून राऊतांचे शिंदेंना ओपन चॅलेंज!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












