Share

“तुमच्यात हिंमत आणि मर्दानगी असेल तर…”; ठाण्याच्या ‘त्या’ व्हिडिओवरून राऊतांचे शिंदेंना ओपन चॅलेंज!

Sanjay Raut lashes out at Eknath Shinde over the viral video of an MNS candidate in Thane, challenging his courage and accusing him of using police pressure.

Published On: 

Shiv Sena Eknath Shinde Criticized Sanjay Raut over his statement about Waqf Bill

ठाणे – राजकारणात जिंकण्यासाठी ‘साम-दाम-दंड-भेद’ वापरला जातो, पण ठाण्यात जे घडलंय ते पाहून लोकशाही जिवंत आहे का? असा प्रश्न पडलाय. ठाण्यातील मनसे उमेदवाराला पोलीस चक्क गाडीत टाकून नेतात आणि असा एक व्हिडीओ व्हायरल होतो… या प्रकाराने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आता यावरून ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना शिंगावर घेतलं आहे. “तुमच्यात हिंमत आणि मर्दानगी असेल, तर असे पाठीमागून खंजीर खुपसण्याचे उद्योग थांबवा आणि समोरून लढा,” असं ओपन चॅलेंज राऊतांनी दिलं आहे.

Sanjay Raut open challenge to Eknath Shinde

मनसे नेते अविनाश जाधव यांनी हा व्हिडीओ समोर आणला होता. पोलीस उमेदवाराच्या घरात घुसतात, त्याला उचलतात आणि थेट उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी नेतात, हा प्रकार धक्कादायक असल्याचं राऊत म्हणाले. “हे काम करण्यासाठी पोलिसांवर नक्कीच दबाव किंवा धमक्या असणार. निवडणूक आयोग यावर काहीच करणार नाही, ते फक्त वेळ काढूूपणा करतील,” असा घणाघात राऊतांनी (Sanjay Raut) केला.

मशाल आणि इंजिनची भीती?

राऊत एवढ्यावरच थांबले नाहीत. “तुम्ही पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, तरीही आम्ही लढतोय. पण आता तुम्हाला मशाल आणि इंजिनची इतकी भीती वाटू लागली आहे की, समोरचा उमेदवार लढूच नये यासाठी तुम्ही प्रयत्न करताय,” असा टोला त्यांनी लगावला. १०-१५ हजार रुपये वाटून लोकांची मतं बदलतील हा तुमचा भ्रम आहे, लोकांच्या मनात या गलिच्छ राजकारणाबद्दल प्रचंड चीड आहे, असंही ते (Sanjay Raut) म्हणाले.

दुसरीकडे, मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा निवडणूक आयोगाने झाकल्याने राऊत आयोगावरही बरसले. “हा आयोगाचा मूर्खपणा आहे. जर बाळासाहेबांचा पुतळा झाकला जातो, तर अटल बिहारी वाजपेयींचे पुतळे का झाकले नाहीत?” असा सवाल करत शिंदे-फडणवीसांना अजूनही बाळासाहेबांच्या नावाची भीती वाटते, असं राऊत म्हणाले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही