🕒 1 min read
दिल्ली – क्रिकेटच्या मैदानात राजकारण कधी घुसणार नाही, याची शाश्वती आता कोणीच देऊ शकत नाही. आयपीएल २०२६ (IPL 2026) च्या लिलावानंतर कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला संघातून डच्चू दिला आणि एका मोठ्या वादाला तोंड फुटलं. बीसीसीआयच्या (BCCI) या निर्णयावर आता काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी सडकून टीका केली आहे. “बांगलादेश म्हणजे पाकिस्तान नव्हे, त्यांनी सीमेपलीकडून दहशतवादी पाठवलेले नाहीत,” अशा शब्दांत थरूर यांनी बीसीसीआयला आरसा दाखवला आहे.
Shashi Tharoor criticizes BCCI
केकेआरने लिलावात तब्बल ९.२ कोटी रुपये मोजून मुस्तफिजुरला आपल्या ताफ्यात घेतलं होतं. मात्र, बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारतातून संताप व्यक्त झाला. त्यानंतर बीसीसीआयने हस्तक्षेप करत केकेआरला मुस्तफिजुरला रिलीज करण्याचे निर्देश दिले.
थरूर म्हणाले, “जर बीसीसीआयनेच मुस्तफिजुरचं नाव लिलावाच्या यादीत टाकलं होतं, तर आता केकेआरला का दोष द्यायचा? त्याला पात्र खेळाडू म्हणून तुम्हीच सादर केलं होतं ना?” खेळाडूंना राजकीय तणावाचे किंवा सोशल मीडियावरील संतापाचे बळी बनवू नका, असा सल्लाही त्यांनी (Shashi Tharoor) दिला.
या एका निर्णयाचे पडसाद थेट आगामी टी-२० वर्ल्ड कपवर (T20 World Cup) उमटण्याची शक्यता आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) आयसीसीला पत्र लिहून खेळाडूंच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त केली आहे. बांगलादेशचे क्रीडा सल्लागार असिफ नझरुल यांनी थेट सवाल केलाय, “जर आमच्या एका खेळाडूला आयपीएलमध्ये बंदी घातली जात असेल, तर आमचा नॅशनल संघ भारतात सुरक्षित कसा राहील?” बांगलादेश आता आपले सामने भारतातून श्रीलंकेत हलवण्याची मागणी करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे हा वाद आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ६, ६, ६, ६, ६, ४… हार्दिक पांड्याचं चक्रीवादळ! ६ चेंडूत ३४ धावा कुटल्या, पण चाहत्यांसाठी एक ‘बॅड न्यूज’
- “तुमच्यात हिंमत आणि मर्दानगी असेल तर…”; ठाण्याच्या ‘त्या’ व्हिडिओवरून राऊतांचे शिंदेंना ओपन चॅलेंज!
- रात्री ‘अपक्ष’, सकाळी ‘राष्ट्रवादी’ची! पिंपरी-चिंचवडमध्ये घडला चमत्कार; गहाळ झालेला एबी फॉर्म नक्की सापडला कुठे?













