🕒 1 min read
दिल्ली – शुभमन गिल (Shubman Gill) फक्त मैदानावरच बॅटिंग करत नाही, तर बोर्डाच्या मिटींगमध्येही आता ‘फ्रंट फूट’वर खेळायला लागलाय. कर्णधार झाल्यापासून गिलचा एक वेगळाच अवतार समोर येतोय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर झालेला ०-२ असा मानहानीकारक पराभव गिलच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. न्यूझीलंडनंतर आफ्रिकेकडूनही व्हाईटवॉश मिळाल्याने टीम इंडियाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. यावर आता गिलने बीसीसीआयला (BCCI) थेट तोडगा सुचवला असून गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) व्यस्त वेळापत्रकावरही मार्ग काढला आहे.
नेमकं प्रकरण काय?
सध्या टीम इंडियाला व्हाईट बॉल क्रिकेटमधून थेट रेड बॉल क्रिकेटमध्ये उतरावे लागते, ज्यामुळे तयारीला वेळ मिळत नाही. वेस्ट इंडिज आणि आफ्रिका दौऱ्यात याचा फटका बसला. यावर उपाय म्हणून गिलने बीसीसीआयकडे “कसोटी मालिकेआधी किमान १५ दिवसांचे सराव शिबीर (Red-Ball Camp) हवेच,” अशी आग्रही मागणी केली आहे.
हेड कोच गौतम गंभीर हे वनडे आणि टी-२० सामन्यांमध्ये व्यस्त असतात. त्यामुळे कसोटीसाठी त्यांना वेळ देता येत नसेल, तर व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (VVS Laxman) यांच्याकडे या शिबिराची जबाबदारी द्या, असा ‘मास्टरस्ट्रोक’ गिलने खेळला आहे. “गंभीर उपलब्ध नसतील, तर लक्ष्मण सरांना पाचारण करा, पण तयारीशी तडजोड नको,” असा स्पष्ट संदेशच त्याने दिला आहे.
बीसीसीआयनेही गिलच्या या आक्रमक भूमिकेच स्वागत केलंय. रोहित शर्मानंतर भारताला एका खंबीर नेतृत्वाची गरज होती, आणि गिल आता सिलेक्टर्ससमोर स्वतःचे व्हिजन स्पष्टपणे मांडत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) पॉईंट्स टेबलमध्ये भारत सध्या सहाव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. त्यामुळे ऑगस्ट २०२६ मध्ये होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी आतापासूनच गिलने ही कंबर कसली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- धावपळ जिवावर बेतली! ‘ऑरेंज कॅप’ विनर साई सुदर्शनला गंभीर दुखापत; विजय हजारे ट्रॉफीतून बाहेर, IPL खेळणार का?
- ‘बांगलादेश म्हणजे पाकिस्तान नव्हे…’; मुस्तफिजुरच्या ‘एक्झिट’वरून शशी थरूर भडकले, बीसीसीआयला सुनावले खडे बोल!
- ६, ६, ६, ६, ६, ४… हार्दिक पांड्याचं चक्रीवादळ! ६ चेंडूत ३४ धावा कुटल्या, पण चाहत्यांसाठी एक ‘बॅड न्यूज’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










