विराट कोहली नव्हे, तर मला कर्णधार बनवणार होते; पार्थिव पटेलचा RCB बाबत खळबळजनक खुलासा

विराट कोहलीऐवजी आपल्याला आरसीबीचा कर्णधार बनवण्याची तयारी सुरू होती, असा धक्कादायक खुलासा माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेलने एका पॉडकास्टमधून केला आहे.

Published On: 

11 deaths during victory celebrations! Virat Kohli in trouble, complaint filed at police station

प्रतिनिधी, 11 ऑक्टोबर: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाच्या कर्णधारपदाबाबत माजी भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेलने एक मोठा खुलासा केला आहे. विराट कोहलीच्या जागी आपल्याला कर्णधार बनवण्याची तयारी झाली होती, असा खळबळजनक दावा त्याने केला आहे.

माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रासोबतच्या एका पॉडकास्टमध्ये बोलताना पार्थिवने हा प्रसंग सांगितला. २०१८ आणि २०१९ मध्ये आरसीबीचे गोलंदाजी प्रशिक्षक असलेले आशिष नेहरा आणि मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी त्याला विराटची जागा घेण्याबाबत कल्पना दिली होती. आपण यापूर्वी याबाबत कधीच बोललो नसल्याचे सांगताना पार्थिवने स्पष्ट केले की, ‘तयार राहा, पुढच्या वर्षी तू कर्णधार होणार आहेस,’ असे त्याला सांगण्यात आले होते. तसेच या शर्यतीत मोईन अलीचाही विचार सुरू होता, असेही त्याने नमूद केले.

मात्र, २०१९ च्या हंगामात आरसीबीचा संघ गुणतालिकेत तळाशी राहिल्याने नेहरा आणि कर्स्टन या दोघांनाही पदावरून हटवण्यात आले. २०२० च्या हंगामासाठी माईक हेसन आणि सायमन कॅटिच यांनी जबाबदारी स्वीकारली आणि सर्व समीकरणे बदलली. नवीन प्रशिक्षक आल्यानंतर पार्थिवला त्या संपूर्ण हंगामात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

२०२० च्या हंगामात एबी डिव्हिलियर्सने यष्टीरक्षणाची जबाबदारी स्वीकारली, तर संघात देवदत्त पडिक्कलला एन्ट्री मिळाली. आरसीबीची ही रणनीती यशस्वी ठरली आणि संघ २०१६ नंतर पहिल्यांदाच प्लेऑफसाठी पात्र ठरला. या हंगामानंतर पार्थिव पटेलने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

दरम्यान, विराट कोहलीने २०२१ मध्ये आरसीबीचे नेतृत्व सोडले आणि त्यानंतर फाफ डुप्लेसीने संघाचे नेतृत्व केले. सध्या संघाचा कर्णधार रजत पाटीदार असून, त्याच्याकडे संघाची धुरा येताच त्याने दोन्ही वर्षी संघाला चॅम्पियन बनवले असल्याचे समोर आले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही