🕒 1 min read
सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर पूर्णपणे खचलेली ‘बिग बॉस १३’ फेम शहनाझ गिल (Shehnaaz Gill) आता आयुष्यात पुढे सरकतेय का? सोशल मीडियावर सध्या याच एका प्रश्नाने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं असून एका नव्या अफेअरची जोरदार चर्चा रंगली आहे.
यावेळी शहनाझचं नाव कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्यासोबत नाही, तर थेट क्रिकेटच्या मैदानावरील एका स्टार खेळाडूशी जोडलं जात आहे. या संपूर्ण वादाची आणि चर्चेची सुरुवात १३ मे रोजी झालेल्या आयपीएल सामन्यादरम्यान झाली. रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू (RCB) विरुद्ध कोलकाता नाईट राईडर्स यांच्यातील लढत पाहण्यासाठी शहनाझ थेट स्टेडियममध्ये पोहोचली होती.
Shehnaaz Gill Dating Rumours
स्टेडियममध्ये आरसीबीला चीअर करतानाचे तिचे अनेक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहेत. शहनाझने स्वतः देखील आरसीबीला सपोर्ट करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तिचा उत्साह स्पष्ट दिसत होता.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी थेट तर्क-वितर्क लढवायला सुरुवात केली. आरसीबीचा स्टार फलंदाज देवदत्त पडिक्कल आणि शहनाझ गिल एकमेकांना डेट करत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. दोघांच्या डेटिंगच्या या अफवांनी इंटरनेटवर नवा वाद पेटवला आहे.
मात्र, या चर्चांवर चाहत्यांमध्ये उभी फूट पडल्याचं पाहायला मिळतंय. एका युझरने संताप व्यक्त करत लिहिलं की, एखादा सेलिब्रिटी मॅच पाहायला गेला म्हणजे त्याचं नाव खेळाडूशी जोडणं साफ चुकीचं आहे. तर दुसऱ्या एका चाहत्याने शहनाझ केवळ आरसीबीची फॅन असू शकते, असं म्हणत तिची पाठराखण केली आहे. दरम्यान, या कथित अफेअरवर शहनाझ गिल किंवा देवदत्त पडिक्कल यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
📌 महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री थलपती विजयला स्टॅलिन यांचा मोठा धक्का; तृषा कृष्णनला दिली १२ कोटींची ऑफर, नेमकं चाललंय काय?
- एबी डिव्हिलियर्सचं वैभव सूर्यवंशीला ओपन चॅलेंज; पण कोचने दिले ‘ते’ २ गुरूमंत्र, आता कसोटीतही उडणार खळबळ!
- प्रवीण तरडेंचं ठरलंय; ‘अनेकांनी कोरे चेक दिले पण…’; आता रुपेरी पडद्यावर येणार अजितदादांचा बायोपिक!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












