Share

एबी डिव्हिलियर्सचं वैभव सूर्यवंशीला ओपन चॅलेंज; पण कोचने दिले ‘ते’ २ गुरूमंत्र, आता कसोटीतही उडणार खळबळ!

आयपीएल २०२६ मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीला एबी डिव्हिलियर्सने कसोटी क्रिकेटचं थेट आव्हान दिलं आहे. यावर कोच मनीष ओझा यांनी वैभवला दोन मोठे गुरूमंत्र दिलेत.

Published On: 

Vaibhav Suryavanshi IPL: डिव्हिलियर्सचं थेट चॅलेंज!

क्रिकेटमध्ये कधी कोणता नवा तारा उदयास येईल आणि कुणाला घाम फोडेल हे सांगता येत नाही, याचाच प्रत्यय आता पुन्हा एकदा आलाय. आयपीएल २०२६ (IPL 2026) च्या हंगामात युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या बॅटने जी आग ओकलीये, त्यामुळे जगभरातील अनेक दिग्गज त्याचे फॅन झालेत.

पण म्हणतात ना, टी-२० म्हणजे क्रिकेटचं सगळं विश्व नाही, खरी परीक्षा ही कसोटी क्रिकेटमध्येच असते! याच मुद्यावरून आता वैभवला थेट मोठं आव्हान मिळालं आहे. स्टुअर्ट ब्रॉडच्या ‘फॉर द लव्ह ऑफ क्रिकेट’ या पॉडकास्टवर बोलताना खुद्द एबी डिव्हिलियर्सने (AB de Villiers) वैभवला थेट ओपन चॅलेंज दिलंय.

Vaibhav Suryavanshi IPL

एबी म्हणाला, “या वयात वैभवची क्षमता खरोखरच कमालीची आहे. पण त्याचं खरं आव्हान हे टी-२० नाही, तर कसोटी क्रिकेट आहे. मी त्याला या मोठ्या फॉरमॅटमध्ये खेळताना पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. कसोटीतच खेळाडूची खरी मानसिक आणि शारीरिक कसोटी लागते.” एबीच्या या विधानानंतर क्रिकेट विश्वात चांगलीच खळबळ उडाली आहे.

या चॅलेंजनंतर वैभवचे कोच मनीष ओझा यांनी मोठं स्पष्टीकरण दिलंय. ओझा यांच्या मते, वैभव हे आव्हान पेलण्यास १०० टक्के सक्षम आहे. बिहारकडून देशांतर्गत क्रिकेट खेळताना त्याने लाल चेंडूवरही मोठी खेळी केलीय. पण, एबीचं हे चॅलेंज जिंकण्यासाठी आणि कसोटीत स्वतःला सिद्ध करण्यासाठी कोचने वैभवला दोन खास गुरूमंत्र दिले आहेत.

यावर बोलताना मनीष ओझा यांनी स्पष्ट केलं की, “पहिलं म्हणजे त्याला चेंडू सोडण्याची कला आणखी प्रगल्भ करावी लागेल आणि दुसरं म्हणजे स्वतःच्या फिटनेसवर अत्यंत बारकाईने लक्ष द्यावं लागेल.” देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने आपली ताकद दाखवली असली, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर संयम आणि फिटनेस यावर त्याला आणखी मेहनत घेणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. आता एबीचं हे आव्हान वैभव कसं पेलतो, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही