Imtiaz Jaleel । राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून (Tomb of Aurangzeb) राजकीय वातावरण तापले आहे. याच मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. तसेच नागपूरमध्ये हिंसाचार देखील औरंगजेबाच्या कबरीवरून झाला आहे.
याच मुद्द्यावरून आता एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला आहे. “हिंदू, हिंदू करून देवेंद्र फडणवीसजी (Devendra Fadnavis) तुम्हाला यामधून काय मिळवायचं आहे?,” असा संतप्त सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला.
“बाळासाहेबांची शिवसेना राहिली आहे का? आता काळ खूप बदलला आहे. बटेंगे तो कटेंगे नाही, तर एक रहेंगे, तो मजबूत रहेंगे हाच आमचा नारा. काम महत्वाचे असून नाम महत्वाचे नाही,” असा घणाघात इम्तियाज जलील यांनी यावेळी केला.
“चारशे वर्षांपूर्वीच्या औरंगजेबचा हिशेब इम्तियाज जलीलला का विचारता? मी आमदार, खासदार होतो, लोकप्रतिनिधी असूनही फक्त मुसलमानांवरून प्रश्न विचारले जातात,” अशी खंत देखील जलील यांनी व्यक्त केली.
Imtiaz Jaleel on BJP
पुढे ते म्हणाले की, “देशातील मुसलमानांचा आणि मुघलांचा संबंध नाही. औरंगजेबला तुम्ही जिवंत केले,” अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली. इम्तियाज जलील यांनी केलेल्या टिकेवरून राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :