Share

“वा! चित्राताई वाघ वा, आज बाळासाहेब असते तर…”, Narayan Rane यांनी केलं कौतुक

by MHD
Narayan Rane appreciate Chitra Wagh

Narayan Rane । दिशा सालियन हत्या प्रकरणावरून (Disha Salian death case) काल सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी हा मुद्दा उचलून धरत दूध का दूध, पानी का पानी व्हायला पाहिजे, अशी मागणी केली.

यावरून राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे. विरोधक वाघ यांच्यावर टीका करत आहेत. पण चित्रा वाघ यांनी सभागृहात मांडलेल्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट करत कौतुक केले आहे.

Narayan Rane post on X

नारायण राणे X वर लिहितात, “वा! चित्राताई वाघ वा! छत्रपती शिवरायांच्या 15 कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात एका निरपराध मुलीवर अत्याचार करुन तिचा खून करणाऱ्यांना आपण चव्हाट्यावर आणले. आपल्याला विरोध करणाऱ्यांचीही तुम्ही चिंधड्या उडविल्या. तुमच्यासारख्या लढवय्या वाघिणींची महाराष्ट्राला गरज आहे. आज आदरणीय बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी तुमचा गौरवच केला असता. लगे रहो चित्राताई!,” असे नारायण राणे म्हणाले आहेत.

नारायण राणे यांच्या पोस्टवरून विरोधक पुन्हा एकदा त्यांच्यावर आणि चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधू शकतात. दरम्यान, नारायण राणे यांच्या पोस्टवर चित्रा वाघ यांनीही देखील एक्स अकाउंटवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.

Chitra Wagh post on X

चित्रा वाघ X वर लिहितात, “धन्यवाद राणे साहेब. उसूलों पे जहाँ आँच आये टकराना ज़रूरी है. जो ज़िन्दा हों तो फिर ज़िन्दा नज़र आना ज़रूरी है. मी सत्यासाठी, न्यायासाठी अशीच लढत राहीन आणि जेव्हा तुमच्या सारखे ज्येष्ठ नेते पाठीशी उभे राहतात तेव्हा लढण्याची ताकद आणखीनच दुणावते, पुनःश्च धन्यवाद नारायण राणे साहेब,” असे चित्रा वाघ म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या :

Narayan Rane has praised Chitra Wagh issue in the House by posting a post on his official X account.

Maharashtra Marathi News Politics