Share

राणेंनी मारामाऱ्या केल्या, मर्डरही झालं आणि एवढ्या उंचीवर पोहोचले; भरत गोगावलेंचं खळबळजनक वक्तव्य

Bharat Gogawale controversially mentions Narayan Rane’s alleged criminal past.

Published On: 

Minister Bharat Gogawale controversially mentions Narayan Rane's alleged criminal past.

🕒 1 min read

सिंधुदुर्ग: शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी सिंधुदुर्गात पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. नारायण राणे यांनी राजकीय जीवनात मारामाऱ्या, गुन्हे आणि अगदी “मर्डर” केल्याचा उल्लेख गोगावले यांनी आपल्या भाषणात केला. महत्त्वाचे म्हणजे, हे वक्तव्य करताना व्यासपीठावर खुद्द नारायण राणे यांचे पुत्र आणि शिवसेनेचे आमदार निलेश राणे उपस्थित होते. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात कुडाळ पावशी येथे बोलताना मंत्री भरत गोगावले म्हणाले की, “नारायण राणे हे एवढ्या उंचीवर सहजासहजी पोहोचलेले नाहीत. त्यांनी अंगावर केसेस घेतल्या, जेलमध्ये गेले, भानगडी केल्या, मारामारी केल्या, मर्डर… हे सगळं झालं आहे. वेगळं सांगायची आवश्यकता नाही.” गोगावले ( Bharat Gogawale ) यांच्या या विधानामुळे नारायण राणे यांच्या राजकीय कारकिर्दीतील अनेक जुन्या प्रकरणांना पुन्हा उजाळा मिळाला आहे.

Narayan Rane committed fights – Bharat Gogawale

गोगावले म्हणाले, “सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वातावरण अनेक वर्षांपासून मी पाहतोय. निलेश राणेंच्या रूपाने सिंधुदुर्गात शिवसेनेला ताकद मिळाली आहे. भानगड केली नाही, तो शिवसैनिक नव्हे, अशी पूर्वीची धारणा होती. केसरकर साहेब भानगडी करणारे नाहीत, त्यामुळे कधीकधी अडचण होते. मात्र निलेश राणे जशास तसं उत्तर देणारे आहेत. पण आता भानगडी करायचे दिवस संपले आहेत. निलेश राणे यांना भानगडी करायची गरज नाही. आता सगळं जुळवून चालवायचं आहे,” असे वक्तव्य त्यांनी ( Bharat Gogawale ) केले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, गोगावले यांनी कार्यकर्त्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला. “तुम्ही आम्हाला निवडून दिलं आहे, त्याची परतफेड करण्यासाठी आम्ही आलो आहोत. येत्या चार महिन्यांत निवडणुका आहेत. तुम्हाला लागेल ती ताकद देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. कोकणात आज आपला पक्ष नंबर एकवर आहे,” असे ते ( Bharat Gogawale ) म्हणाले.

महायुतीतील समन्वयावर बोलताना गोगावले म्हणाले की, “सगळीकडे महायुती म्हणून जुळेल असंही नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमचे दोन तर भाजपचा एक आमदार आहे. आम्हाला समजून घेतलं तर आम्ही तुम्हाला समजून घेऊ. आम्ही गरिबांचे शेठ आहोत, श्रीमंतांचे नाही. आमच्याकडे मनाची श्रीमंती आहे. आम्ही पालकमंत्री पण होऊ, आम्ही काम करतोय, त्याचा मोबदला मागतोय.” आपल्या खात्यातून कोकणाला झुकते माप देण्याचे आश्वासनही त्यांनी ( Bharat Gogawale ) दिले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Crime Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या