🕒 1 min read
सोलापूर: महाराष्ट्रात हिंदी भाषेच्या सक्तीवरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना, जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. “हिंदी सक्तीचे धोरण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच स्वीकारले होते आणि येत्या पावसाळी अधिवेशनात ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होईल,” असा इशारा राठोड ( Sanjay Rathod ) यांनी दिला.
पत्रकारांशी बोलताना संजय राठोड म्हणाले की, “उद्धव ठाकरे हे केंद्राच्या भूमिकेबाबत कायमच सोयीस्कर पद्धतीने भूमिका घेतात. त्यांना जेव्हा फायद्याचे असते, तेव्हा ते बोलतात आणि जेव्हा फायद्याचे नसते, तेव्हा गप्प बसतात. आमच्या विदर्भाच्या भाषेत याला ‘आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे…’ असे म्हणतात.”
Sanjay Rathod warns Thackeray on Hindi imposition
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या त्रिभाषी सूत्रावर यापूर्वीच योग्य ते स्पष्टीकरण दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळातच यावर अभ्यास समिती नेमण्यात आली होती, असे फडणवीस यांनी सांगितले होते. यावर संजय राठोड म्हणाले की, “संजय राऊत यांनी फडणवीसांवर चुकीचा आरोप केला आहे. त्यामुळे आगामी पावसाळी अधिवेशनात सर्व काही जनतेसमोर येईल.”
हिंदीच्या मुद्द्यावर मोर्चे काढण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या चर्चेच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्यास, चर्चेतूनच हा प्रश्न सुटेल, असा विश्वासही संजय राठोड यांनी व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी संजय राठोड यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक खळबळजनक दावा केला होता. उद्धव ठाकरे यांच्याशी आपले आजही चांगले संबंध असून, त्यांचे आजही आपल्याला फोन येतात, असे राठोड ( Sanjay Rathod ) म्हणाले होते.
महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना संजय राठोड यांच्यावर एका तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी गंभीर आरोप झाले होते. भाजपने त्यावेळी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती आणि याच प्रकरणात त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या घटनेमुळे नाराज झालेले संजय राठोड ( Sanjay Rathod ) यांनी शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केले. महायुती सरकारमध्येही त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळाल्याने विरोधकांनी त्यावेळीही त्यांच्यावर टीका केली होती. आता हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राठोड यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केल्याने, अधिवेशनात यावर मोठे घमासान होण्याची शक्यता आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ठाकरेंचा मोर्चा निघण्याच्या आधीच भाजप हिंदीचा निर्णय मागे घेतील- हर्षवर्धन सपकाळ
- पंढरपूरमध्ये लाखोंच्या रांगेतही आमदार संतोष बांगर यांना २१ कार्यकर्त्यांसाठी हवं VIP दर्शन
- “पाच वर्षे चेअरमन मीच होणार”; माळेगाव विजयानंतर अजित पवारांची तुफानी फटकेबाजी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








