Sushma Andhare । दिशा सालियन प्रकरणावरुन (Disha Salian death case) राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. सत्ताधारी आणि विरोधक याच मुद्द्यांवरून एकमेकांवर निशाणा साधत आहेत. अशातच आता भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी निशाणा साधला आहे.
“वाघ बाईंनी काल जी भाषा वापरली त्यावर मी पुन्हा जाणार नाही. भाजपकडून होत असणारा वाघबाई आणि किरीट सोमय्या यांचा वापर दिसत आहे. वाघ बाईंनी कमी आकडा सांगितला तो कमी आहे,” असे अंधारे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
“एक बाई विचित्रपणे किंचाळत होत्या. अनेकजण म्हणाले की झोपडपट्टीतील भाषा वापरली जात होते. पण झोपडपट्टीला सुद्धा एक क्लास असतो. झोपडपट्टीतील लोक कधीच आपला इमान विकत नाहीत,” असा टोला अंधारे यांनी लगावला.
“कधीकाळी या बाई पक्ष प्रवेशासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे लोळत आल्या होत्या. उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना क्लीन चिट दिली असे यांचे मत असेल तर ते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री कसे?,” असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
Sushma Andhare Criticizing BJP over Nagpur violence
पुढे त्या म्हणाल्या की, “भाजपशी निगडित नागपूर हिंसाचारातील (Nagpur violence) आरोपी आहे. त्याबाबत आपण लवकरच पुरावे दाखवणार आहोत. हा हिंसाचार अंगाशी आला असल्याने त्यांनी दिशा सालियन प्रकरण बाहेर काढले आहे,” असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :