Somnath Suryawanshi । काही दिवसांपूर्वी परभणी येथे झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी याला अटक केली होती. पण त्याचा परभणी जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत मृत्यू (Somnath Suryawanshi case) झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याला न्याय मिळावा, अशी मागणी राज्यभरातून होत आहे.
अशातच आता त्याच्या मृत्यूबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला पोलीस जबाबदार असून त्यांना परभणी जिल्ह्यातील नवामोंढ पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आली, असा निष्कर्ष न्यायदंडाधिकाऱ्यांनी चौकशीतून काढला आहे.
451 पानांचा हा गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर केला आहे. न्यायालयीन कोठडीमध्ये असताना सोमनाथ सूर्यवंशीला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना रुग्णालयामध्ये नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करणाऱ्या त्या पोलिसांच्या आता अडचणी वाढल्या आहे, असे बोलले जात आहे.
दरम्यान, सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूनंतर दोन महिन्यांनी पोलीस उपनिरीक्षक कर्तिकेश्वर तूरनर, पोलीस कर्मचारी सतीश दैठणकर, मोहित पठाण, राजेश जठाल आणि पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांचे निलंबन केले आहे.
Vijayabai Suryavanshi demand in Somnath Suryawanshi case
“आम्हाला राज्य सरकारची कोणतीही मदत नको, पण दोषींवर कारवाई झालीच पाहिजे,” अशी ठाम भूमिका सोमनाथ सूर्यवंशीच्या आई विजयाबाई सूर्यवंशी (Vijayabai Suryavanshi) यांनी घेतली आहे. त्यामुळे आता दोषींवर कोणती कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :