Share

“भाजप आमदार पोलिसांना क्लिनचीट का देत आहे?”; विजय वडेट्टीवार यांचा Suresh Dhas यांना संतप्त सवाल

by MHD
Vijay Wadettiwar criticizes Suresh Dhas over Somnath Suryavanshi death case

Suresh Dhas । आंबेडकरी अनुयायाकडून काल सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) आणि विजय वाकोडे (Vijay Wakode) यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी परभणी ते मुंबई लॉंग मार्च काढण्यात आला होता. पण हा लॉंग मार्च पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्या मध्यस्थीने नाशिक येथेच थांबवण्यात आला. यावरून सुरेश धस यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधला आहे.

त्यांच्या या निर्णयावरून राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून सुरेश धस यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धस हे पोलिसांवर गुन्हे दाखल करणे संयुक्तिक ठरणार नाही, असे बोलताना दिसत आहेत. हाच मुद्दा उचलून धरत वडेट्टीवार यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे. (Vijay Vadettiwar vs Suresh Dhas)

विजय वडेट्टीवार X वर लिहितात, “हा व्हिडिओ बघा! भाजपचे आमदार सुरेश धस यांचा दुटप्पीपणा.एकीकडे सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी काढण्यात आलेल्या मोर्च्यात सुरेश धस सहभागी होतात. आणि दुसरीकडे म्हणतात की पोलिसांवर गुन्हे दाखल करू नका. भाजप आमदार पोलिसांना क्लिनचीट का देत आहे? सोमनाथ सुर्यवंशी यांच्या जीवाची किंमत नाही का?

Vijay Vadettiwar criticizes Suresh Dhas

“एका आईने आपला मुलगा आणि कुटुंबाने आधार गमावला आणि पोलिसांना फक्त सुनावलं म्हणून सोडून द्यायचे? हा न्याय असू शकतो का? सुरेश धस यांना परभणी प्रकरणात सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय का मिळू द्यायचा नाही?” असा संतप्त सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Suresh Dhas यांनी काल सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी काढलेला परभणी ते मुंबई लॉंग मार्च नाशिक येथेच थांबवला. यावरून त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे.

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now