Vijay Wadettiwar | पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप सर्वपक्षीय राजकीय नेत्यांकडून केला जात आहे. या प्रकरणास रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप झाल्यानंतर रुग्णालयाने देखील एक चौकशी समिती नेमली. या समितीचा अहवाल समोर आला, त्यानंतर आज शासकीय समितीच्या अहवालाची माहिती राज्य शासनाला आणि महिला आयोगाला देण्यात आली आहे.
Vijay Wadettiwar Criticized State Government Over Tanisha Bhise Case
या अहवालात देखील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसेंना वेळेत उपचार दिले नाहीत असं म्हणण्यात आलं आहे. यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी एकावर पोस्ट करत सरकारला सवाल केले आहेत.
“मंगेशकर रुग्णालय प्रकरणी चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल अखेर समोर आला आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून सातत्याने मागणी करत आलो आहोत या प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करा. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे धर्मदाय रुग्णालय असूनही रुग्णांकडून पैसे घेऊनच उपचार केले जातात. ही कोणती सेवा? हा कोणता धर्म?”, असे खोचक सवाल विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलेत.
“डॉक्टरांनी राजीनामे देत जबाबदारी झटकली, आणि आता पळवाट शोधण्याचे काम सुरु आहे! सरकार अजून तरी नक्की कशाची वाट बघत आहे? पुन्हा काही पळवाटा शोधायच्या आहेत की सरळ सरळ क्लिनचीट द्यायची आहे?? या प्रकरणातील डॉक्टर असो किंवा रुग्णालय प्रशासन जे कोणी जबाबदार आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे”, अशी मागणीही त्यांनी केलीय.
महत्वाच्या बातम्या :