Share

Kunal Kamra याला दिलासा; मद्रास उच्च न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय

The Madras High Court has extended Kunal Kamra interim bail

Kunal Kamra । स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर विडंबनात्मक टिप्पणी केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. महायुतीच्या नेत्यांनी कुणाल कामराविरोधात (Kunal Kamra) टीकेची झोड उठवली आहे. यानंतर कुणाल कामरा याला मुंबई पोलिसांनी अनेकदा समन्स बजावले. मात्र अद्याप कुणाल कामरा चौकशीसाठी हजर राहिलेला नाही. कुणालविरोधात राज्यातील विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.

The Madras High Court has extended Kunal Kamra’s interim bail

या प्रकरणात कुणाल कामराला अटक करण्याची मागणी शिवसेनेच्या नेत्यांकडून केली जात आहे. मात्र, मद्रास उच्च न्यायालयाने कुणाल कामराला अटकपूर्व जामीन मंजूर करत ७ एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं होतं. आज अटकेपासून संरक्षणाची ही मुदत संपली असतानाच मद्रास उच्च न्यायालयाने कुणाल कामराला पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे. मद्रास उच्च न्यायालयाने कुणाल कामरा याच्या अंतरिम जामिनाची मुदत १७ एप्रिलपर्यंत वाढविली आहे.

त्याचबरोबर मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरविरोधात कुणाल कामराने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ही एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली असल्याची माहिती समोर येतेय. कुणाल कामराकडून शनिवारी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात पुढे काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागेलेलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

The Madras High Court has extended Kunal Kamra’s interim bail till April 17.

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now