Deenanath Mangeshkar | पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये (Deenanath Mangeshkar Hospital) पैशांमुळे योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी शहरात संतापाची लाट उसळली. या प्रकरणी शासकीय समितीच्या आधारे रूग्णालयाची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणास रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप झाल्यानंतर रुग्णालयाने देखील एक चौकशी समिती नेमली. या समितीचा अहवाल समोर आला, त्यानंतर आज शासकीय समितीच्या अहवालाची माहिती राज्य शासनाला आणि महिला आयोगाला देण्यात येत आहे.
Dr. Ghaisas of Deenanath Mangeshkar Hospital has resigned
चौकशी अहवालातून देखील रुग्णालयावरच ठपका ठेवण्यात आला आहे, त्यानंतर आता डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा रुग्णालयाचे संचालक डॉ. धनंजय केळकर यांच्याकडे सुपूर्द केला. या अहवालनानंतर कायदेशीर कारवाई करत हॉस्पिटल प्रशासनावर गुन्हा देखील दाखल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप सर्वपक्षीय राजकीय नेत्यांकडून केला जात आहे. रुग्णालयाबाबत कुठलेही राजकारण न आणता या संबंधित प्रशासनावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही जोर धरत आहे. या प्रकरणात पुढे काय होणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
महत्वाच्या बातम्या :