Uddhav Thackeray । राज्यातील राजकीय वातावरण अनेक मुद्द्यांवरून तापलेलं आहे. सत्ताधारी पक्षांनी लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवणार असल्याचं सांगितलं होतं. कर्जमाफीचं आश्वासन देखील दिलं होतं. मात्र याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. याच मुद्द्यांवरून शिवसेनेचे (ठाकरे गट) सर्वेसर्वा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
Uddhav Thackeray Criticized State Government
“निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीने लाडकी बहिणी योजना सुरू केली. त्यानंतर रक्कम वाढवण्याचे आश्वासन दिले, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले. पण मते मिळाल्यावर आता लोकांची फसवणूक केली. यामुळे या लोकांची रामाचे नाव घेण्याची पात्रता नाही”, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली आहे.
त्याचबरोबर काल रामनवमीनिमित्त शुभेच्छा देताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपला चांगलाच टोला लगावला. “मी भाजपाला शुभेच्छा देताना पुन्हा सांगतोय प्रभू रामाप्रमाणे वागा. रामाच्या पावलावर पाऊल ठेवून चाला”, असा सल्लाही उद्धव ठाकरेंनी दिला.
महत्वाच्या बातम्या :