Share

महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध असल्याच्या प्रकरणावरून Eknath Khadse यांचा महाजनांवर पलटवार; म्हणाले…

Eknath Khadse criticizes Girish Mahajan over his relationship with a female IAS officer

Eknath Khadse । राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यातील राजकीय वैर सर्वांनाच माहित आहे. अशातच एका पत्रकाराच्या व्हायरल क्लिपचा धागा पकडत एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केलेत. गिरीश महाजन यांचे एका महिला आयएस अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या आरोपांचं खंडन करत जोरदार पलटवार देखील केला आहे. “कमरेच्या खाली वार केल्याशिवाय त्यांना दुसरं काही जमत नाही. त्यांची अवस्था किती वाईट आहे हे महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे मी इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही”, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेवर देखील एकनाथ खडसे यांनी वक्तव्य केलं आहे. महाजनांवरचा हा आरोप मी केला नसून गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी केला असल्याचं स्पष्टीकरण एकनाथ खडसे यांनी दिलं आहे.

Eknath Khadse Criticized Girish Mahajan

“हा आरोप गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी केला आहे. अमित शाहांच्या सीडीआरचा उल्लेख करत हा आरोप केला आहे. त्यामुळे उगाचच गिरीश महाजनांनी माझ्या नाव घेऊन आदळआपट करण्याची आवश्यक नाही. त्यांनी अनिल थत्तेंकडे पुरावे मागावेत. अनिल थत्तेंच्या वक्तव्याचा धागा पकडून मी बोललो. यामागचं सत्य काय आहे ते सांगा अन्यथा अनिल थत्तेंवर कारवाई करा”, असं एकनाथ खडसे यांनी म्हंटल आहे. यावर आता गिरीश महाजन काही उत्तर देतात का ?  हे पाहावं लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

Eknath Khadse criticizes Girish Mahajan over his relationship with a female IAS officer.

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now