Gunratna Sadavarte । राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यातील राजकीय वैर सर्वांनाच माहित आहे. एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गिरीश महाजन यांचे एका महिला आयएस अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
त्यांनी केलेल्या आरोपाला महाजन यांनीसुद्धा जोरदार उत्तरं दिलं असून मी जर त्यांच्याबद्दल तोंड उघडलं तर लोक त्यांना बाहेर आल्यावर जोड्याने मारतील, असा इशारा देखील दिलाय. दरम्यान, त्यांच्या या वादात वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी देखील उडी घेतली आहे.
Gunratna Sadavarte Criticized Eknath Khadse
एकनाथ खडसे यांनी माफी मागावी अशी मागणी गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी केली आहे. त्यांनी जर माफी नाही मागितली तर मी राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
सदावर्ते म्हणाले, “महिला अधिकारी या सावित्रीच्या लेकी, तुम्ही त्यांना बदनाम करू नका, गिरीश महाजन यांना बदनाम करू नका, खडसे तुम्ही माफी मागा, जर माफी मागितली नाही तर राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार करणार आहे.” सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली असं एकनाथ खडसे यांचं वागणं असल्याचं सदावर्ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :