Share

एकनाथ खडसेंच्या ‘त्या’ आरोपांवर Girish Mahajan म्हणाले, “कमरेच्या खाली…”

Girish Mahajan has reacted to Eknath Khadse's allegations.

Girish Mahajan | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यातील राजकीय वैर सर्वांनाच माहित आहे. अशातच आता एका पत्रकाराच्या व्हायरल क्लिपचा धागा पकडत एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केलेत. गिरीश महाजन यांचे एका महिला आयएस अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Girish Mahajan Reaction On Eknath Khadse Allegations

दरम्यान, गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या आरोपांचं खंडन करत जोरदार पलटवार देखील केला आहे. “कमरेच्या खाली वार केल्याशिवाय त्यांना दुसरं काही जमत नाही. त्यांची अवस्था किती वाईट आहे हे महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे मी इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही”, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली आहे.

“ते ज्येष्ठ आहेत. वयाने मोठे आहेत. बोलताना त्यांनी माझ्या कामाबद्दल बोलावं, माझ्या भ्रष्टाचाराबद्दल बोलावं. जे सत्य असेल ते बोला. मी सात वेळा आमदार आहे, मंत्री आहे त्यामुळे हे बघून त्यांची जळफळाट होत आहे. त्यामुळे ते वाटेल ते बेभान स्टेटमेंट करत आहेत”, असंही गिरीश महाजन म्हणालेत. त्याचबरोबर एकनाथ खडसे यांनी एक पुरावा दाखवावा, मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेल, असं आव्हानही गिरीश महाजन यांनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

Girish Mahajan has reacted to Eknath Khadse’s allegations.

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now