Eknath Khadse । विविध मुद्द्यांवरून राज्याचे राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर येतेय. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यातील राजकीय वैर सर्वांनाच माहित आहे.
Eknath Khadse makes serious allegations On Girish Mahajan
आता एका पत्रकाराच्या व्हायरल क्लिपचा धागा पकडत एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केलेत. गिरीश महाजन यांचे एका महिला आयएस अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पत्रकार अनिल थत्ते यांच्याकडे याबाबतचे पुरावे असल्याची माहिती एकनाथ खडसेंनी दिली आहे.अमित शाहांकडे गिरीश महाजन यांचे सर्व कॉल रेकॉर्ड्स आहेत, असा दावा एकनाथ खडसेंनी केलाय.
एकनाथ खडसे म्हणाले की, “पत्रकार अनिल थत्ते यांनी गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले आहेत. थत्ते यांनी असे म्हटले आहे की, गिरीश महाजन यांनी रात्रीचे एका आयएस अधिकाऱ्यांना शंभर शंभर फोन केलेत. त्या अधिकारी कोण आहेत हे सर्वांना माहित आहे. परंतु कोणत्या अधिकाऱ्याचे असे नाव घेणे योग्य नसल्याने मी नाव घेत नाही.”
महत्वाच्या बातम्या :