Sanjay Raut । लोकसभेत वक्फ बोर्ड विधेयक संमत झाल्यानंतर राज्यसभेत विधेयकावर चर्चा सुरू आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांनी या विधेयकाविरोधात मतदान केलं. त्यावरून भाजपासह त्यांचे मित्रपक्ष हे उद्धव ठाकरे व त्यांच्या पक्षावर निशाणा साधत आहेत. दरम्यान, या संदर्भात बोलताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा उल्लेख एसंशि असा केला होता.
Sanjay Raut Criticized Eknath Shinde
यावर “मला एसंशि म्हणाले मग मी त्यांना युटी म्हणू का? युज ॲंड थ्रो?”, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. “आमदार खासदार गेले असतील, पण त्यांचा जो पक्ष आहे एसंशि… त्यांनी use and थ्रो असे म्हटले. त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे B हे नाव आहे, त्यांचे नाव कसे काढणार? त्यात मध्ये ‘ब’ आहे. तो काढता येणार नाही. कारण बाप आहे तो. जोपर्यंत तो बाप आहे तोपर्यंत एसंशि काही करु शकत नाही”, असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
त्याचबरोबर “शिवसेना फोडायची आणि मोदींच्या पायाशी ठेवायची हा एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता”, असंही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हंटल आहे. पण एकनाथ शिंदेंच्या त्या ड्रीम प्रोजेक्टला संमती मिळाली नाही. शिवसेना आजही मजबुतीने उभी आहे, असंही राऊत म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या :