Sanjay Raut । पुण्यातील दीनानाथ रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला रुग्णालय प्रशासनानं दहा लाख रुपये जमा करण्यास सांगितले, तोपर्यंत तीला दाखल देखील करून घेतले नाही. उपचार न मिळाल्यानं तिचा मृत्यू झाल्याचा आरोप या महिलेच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.
Sanjay Raut Criticized Devendra Fadanvis
तनिषा भिसे असं या महिलेचं नाव आहे. या प्रकरणाला राजकीय वळण देखील मिळालं आहे. अशातच आता या प्रकारावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदाची लेवल नसल्याचं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणालेत.
“मुख्यमंत्री पदाला जो दर्जा लागतो तो दर्जा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाही, पण तो दर्जा येईपर्यंत त्यांचं मुख्यमंत्री पद जाईल”, असा घणाघात संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. त्याचबरोबर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आरएसएसची लोक काम करत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :