Sanjay Raut : शिवसेना (Shivsena) पक्षाचे नाव आणि चिन्ह कोणाकडे असावे, यावरून सुरू असलेला वाद अद्याप सुटलेला नाही. या प्रकरणावर काल सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी झाली आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या कामकाजाबाबत माहिती दिली. आज दुपारी २:३० वाजता यावर पुन्हा सुनावणी होणार आहे. त्याआधी, राऊत यांनी या घडामोडींवर एक मार्मिक टिप्पणी केली. दरम्यान, ‘गुंगी गुड़िया’ या शब्दावरून राज्यात कालपासून राजकीय खळबळ उडाली आहे. राऊत यांनी या मुद्द्यावर सविस्तर भाष्य केले आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सल्लाही दिला.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबतीत ‘गुंगी गुड़िया’ अशी टीका केली आहे, त्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अत्यंत व्यवस्थित खुलासा केला आहे, असे मला वाटते. सुनेत्राताई या राजकारणात नवीन असल्या तरी, त्यांच्या माहेरी आणि सासरी राजकारण आहे. हळूहळू त्या राजकारणात स्थिरावतील. पण ज्या पद्धतीने बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न विचारला गेला. त्यावर त्यांनी मौन बाळगले. त्यावर काँग्रेसने ही प्रतिक्रिया दिली. त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. बीड जिल्ह्यातील नेते, धनंजयराव मुंडे हे त्यांच्या बाजूला होते. हा प्रश्न त्यांच्यासंदर्भात होता. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी भाष्य करणे योग्य ठरलं असतं. हा त्यांचा प्रश्न आहे. धनंजय मुंडे यांनी त्यांचा ताबा घेतल्याचे मी ऐकले. पत्रकार परिषद गुंडाळून त्या निघून गेल्या. त्या जागी जर एखादा पुरूष मंत्री असता. एकनाथ शिंदे अथवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असते. तर त्यांना गुंगा गुड्डा म्हटल्या गेलं असतं, अशी प्रतिक्रिया खासदार राऊत यांनी दिली.
Sanjay Raut Supreme Court Shivsena symbol hearing reaction
“आपण राजकारणामध्ये आहोत, आपण टीका सहन करायला हवी. इंदिरा गांधी यांना ‘गुंगी गुड़िया’ ही उपाधी देण्यात आली होती. पण इंदिराजींनी हे सिद्ध केलं की त्या ‘गुंगी गुड़िया’ नाहीत. यामध्ये स्त्री आणि पुरूष असा भेद करणे योग्य नाही. घटनात्मक पदावर आपण आहोत. अत्यंत संयमाने आपण भाष्य करणे हे गरजेचे असते. सुनेत्राताई यातून नक्कीच शिकतील. माझ्या भाषेविषयीचा प्रश्न तुम्ही कोणाकडे काढत आहात? गुंगी गुड्डिया हा असंवैधानिक शब्द नाही. हा नेहमीतील वापरातील शब्द आहे. त्यांना बारामतीत घरी जाऊन कोणी प्रश्न विचारला नाही. त्यांनी घटनात्मक पदाची शपथ घेतली आहे. त्या बीडच्या पालकमंत्री आहे. त्यांना बीडच्या कायदा आणि सुरक्षेवरती प्रश्न विचारला असेल तर त्यामागील राजकीय पक्षाच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. जेव्हा असे प्रश्न विचारले जाईल, तेव्हा सुनेत्राताईंनी त्यावर मौन बाळगू नये. त्यांनी उत्तर द्यावे. त्या ठिकाणी धनंजयराव मुंडे असते आणि त्यांना असा प्रश्न विचारला असता तर कदाचित अशीच प्रतिक्रिया आली असती.” असे संजय राऊत म्हणाले.
“राष्ट्रवादी हा जो त्यांचा पक्ष आहे, तो अमित शाह यांचा पक्ष आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. अमित शाह हे सध्या लपून बसलेले आहेत. जंतर मंतरवर आंदोलकांवर लाठीमार झाला. पॅलेट गन वापरल्या गेला. त्यावर ते मौन बाळगून आहेत. म्हणजे ते गुंगा गुड्डा आहेत. मोदीही गुंगा गु्ड्डा आहेत. गृहमंत्री जोपर्यंत जंतरमंतरवरील लाठीचार्ज, टिअर गॅस आणि पॅलेट गन याच्या वापराचे आदेश कोणी दिले हे सांगत नाहीत, राम मंदिर दान पेटी लुटीचा प्रश्न गंभीर आहे. हा विषय दोन्ही सभागृहात आहे, त्यावर पंतप्रधान मोदी यांना उत्तर द्यावे लागेल. तोपर्यंत संसदेचे कामकाज होणार नाही.” असे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
सुप्रीम कोर्ट सुनावणीवर चिमटा
“काल आम्ही दिवसभर सुप्रीम कोर्टात बसून होतो. मुख्य न्यायाधीशांसमोर आमचे हसरे चेहरे दाखवत बसून होतो. तेही आम्हाला पाहत होते, आम्ही त्यांना पाहत होतो. नजरेची टक्कर होत होती. पण न्याय काही मिळत नव्हता. 36 वा क्रमांक होता आमच्या खटल्याचा. 35 वा खटला सुरू होणार तोच कोर्ट उठलं, आम्हाला आश्चर्यच वाटलं. बुंदी आता आमच्या ताटात कधी पडेल ते आम्ही बघू. पण त्यानंतर कपिल सिब्बल, देवदत्त कामत, असीम सरोदे हे आमची सुप्रीम कोर्टात बाजू मांडत आहेत. सिब्बल यांनी सांगितले की आजही आम्ही आमचा युक्तीवाद करायला तयार आहोत. कोर्टाने आज दुपारी 2:30 वाजता आम्हाला सुनावणीसाठी वेळ निश्चित केली आहे. कोर्ट आज आमचा युक्तीवाद ऐकणार आहे. आज परत जाऊन आम्ही समोर बसू.” असे देखील संजय राऊत म्हणाले.
📌 महत्वाच्या बातम्या
- Anil Deshmukh यांना मोठा झटका; 100 कोटी वसुली प्रकरणात आता थेट खटला चालणार!
- Eknath Shinde यांची नाराजी चर्चेत; शिवसेनेतील चार मंत्र्यांची खाती बदलणार?
- वयाच्या 74 व्या वर्षी प्रदीप रावत यांचे निधन; ‘महाभारत’पासून ‘गजनी’पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












