Devendra Fadanvis । पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या तनिषा भिसे (Tanisha Bhise) यांच्या कुटुंबाकडे दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न भरल्यानं या महिलेला रुग्णालयात दाखल करून घेतलं नाही. योग्यवेळी उपचार न मिळाल्यानं या महिलेचा मृत्यू झाला, असा आरोप रुग्णालयावर करण्यात येत आहे.
Devendra Fadanvis Reaction On Tanisha Bhise Death Case
या प्रकरणानंतर आता राज्यभरात वातावरण चांगलंच तापलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी या प्रकरणावर बोलताना, “सगळी काही रुग्णालयाची चूक आहे असे म्हणण्याचे कारण नाही. मात्र, कालचा प्रकार हा असंवेदनशीलच होता”, असे म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले, “जिथे चूक आहे तिथे चूक म्हणावे लागेल ती चूक सुधारावी लागेल जर ते चूक सुधारण्याचा प्रयत्न करत असतील तर मला त्याचा आनंद आहे.” त्याचबरोबर या प्रकरणी दोषींना शिक्षा झाली पाहिजे. भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून एसओपी तयार झाले पाहिजेत, या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली.
महत्वाच्या बातम्या :