Share

‘माझी नार्को टेस्ट करा’; मनोज जरांगेंच्या आरोपांवर बावनकुळे यांचा पलटवार

चंद्रशेखर बावनकुळे यांनी जात पडताळणी प्रक्रियेत हस्तक्षेप शक्य नसल्याचे सांगत नार्को टेस्टलाही तयार असल्याचे म्हटले.

Published On: 

Chandrashekhar Bawankule responds to Manoj Jarange allegations

मुंबई : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी अलीकडेच भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपांना उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, माझी नार्को टेस्ट करता येईल. माझी परवानगी आहे. जे जात पडताळणी विभाग आहे, हा अर्ध न्यायिक आहे. त्यात हस्तक्षेप करता येत नाही. कोणताही मंत्री या ऑथोरिटीला फोन करू शकत नाही. जात पडताळणीचा जो काही निर्णय त्यात बावनकुळे किंवा इतर कोणी फोन करतात हे म्हणणे योग्य नाही. त्यांच्या न्यायालयीन अधिकारात कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही, तसा अधिकार कोणालाही नाही. जरांगे यांनी तशी विधाने का केली, हे मला माहित नाही. जात पडताळणी समितीच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागता येते. जर कोणाला अन्याय झाल्याचे वाटत असेल, तर त्यांनी उच्च न्यायालयात (High Court) अपील करून स्थगिती आदेश (stay order) मिळवावा.”

बावनकुळे पुढे म्हणाले, “त्यांनी नेमके काय म्हटले यावर मला चर्चा करायची नाही. ही एक अर्ध न्यायिक जात पडताळणी प्रक्रिया आहे. जात पडताळणीवर कोणता मंत्री फोन करेल आणि त्यावर समिती ऐकेल असे होत नाही. कोणत्याही राज्यात असे होत नाही. जर त्यांना अन्याय झाल्याचे वाटत असेल, तर ते न्यायालयात न्याय मागू शकतात.”

Chandrashekhar Bawankule responds to Manoj Jarange allegations

“प्रमाणपत्रे का रद्द केली जात आहेत, याचे स्पष्टीकरण समिती देऊ शकते, संबंधित माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि कोणाची जात पडताळणी झाली आहे हे कोणीही पाहू शकते. समितीकडे अर्ध न्यायिक अधिकार असतात आणि त्यावर भाष्य करण्याचा अधिकार कोणालाही नाही. मंत्री असे फोन करू शकत नाहीत कारण त्यांना तसा अधिकारच नाही.” मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांवर बावनकुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली.

मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले आणि त्यांच्यावर “डबल गेम” (double game) घेत असल्याचा ठपका ठेवला. जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आरोप केले. मात्र, जरांगे यांनी नेमके काय म्हटले आहे हे आपण प्रत्यक्ष ऐकले नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही