Karuna Munde । अजितदादा गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्याबाबत करुणा मुंडे यांनी आणखी एक मोठा दावा केला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने गेल्या सुनावणीत करुणा मुंडे यांना धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची पत्नी ठरवत महिन्याला 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे निर्देश दिले होते. मात्र, करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी आपल्याला महिन्याला 15 लाख रुपयांची पोटगी हवी असल्याची मागणी केली होती. यानंतर धनंजय मुंडे यांनी आपण करुणा मुंडे यांच्याशी लग्न केल्याचा दावा फेटाळला.
धनंजय मुंडे यांनी या सर्व दाव्याला विरोध करत ‘करुणा शर्मा पत्नी नव्हत्या, ते दोघं केवळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते’, असं कोर्टात सांगितलं. करुणा करुणा मुंडे यांच्याकडे वैध विवाहाचे प्रमाणपत्र नाही. त्यामुळे त्यांना पत्नी म्हणता येणार नाही, असं धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे वकील युक्तीवाद करताना म्हणाले.
यावर “आमचं लग्न मंदिरात झालं, त्यावेळी त्यांचे लोक आणि आमचे लोक होते. राजश्री आणि धनंजय मुंडेंचं लग्नही तसंच झालं होतं. त्याकाळात लग्नाचे सर्टिफिकेट होत नव्हते. मात्र, माझ्याकडे इतर पुरावे आहेत आणि ते मी लवकरच कोर्टात सादर करेन”, असे करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी म्हंटल.
Karuna Munde made serious allegations against Dhananjay Munde
दरम्यान, करुणा मुंडे कोर्टातच संताप व्यक्त करत म्हणाल्या की, “माझे वकील योग्यरित्या बाजू मांडत नाहीत, त्यामुळे मी स्वतः मांडते.” त्यांनी स्पष्ट केलं की, “धनंजय मुंडे यांनी माझं जीवन उद्ध्वस्त केलं. माझ्या आणि मुलांच्या जीवाला कायम धोका आहे. २० कोटींचा सौदा करून माझ्याशी लग्न करणाऱ्याला पैसे देणार होते.”
महत्वाच्या बातम्या :