Manikrao Kokate । काल (५ एप्रिल) शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) हे नाशिकच्या दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल जे वक्तव्य केलं त्यावरून ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
कर्जाच्या पैशांमधून लग्न, साखरपुडा करता असं माणिकराव कोकाटे यांनी एका शेतकऱ्याला म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून तसेच जनतेतून देखील तीव्र पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. दरम्यान, त्यांनी या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे.
Manikrao Kokate has apologized for his statement
शेतकऱ्यांची अनावधानाने आणि मस्करीत कुस्ती झाल्यानं असं वक्तव्य केल्याचे माणिकराव कोकाटे म्हणाले. “शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखावला गेला असेल, भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो”, असं म्हणत त्यांनी माफी मागितली आहे.
काय म्हणाले होते माणिकराव कोकाटे?
कर्जमाफी होणार आहे का? असा प्रश्न विचारणऱ्या शेतकऱ्यावर कोकाटे चांगले संतापले. पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता. तोपर्यंत कर्ज भरत नाही, कर्जाच्या पैशांमधून लग्न, साखरपुडा करता असं माणिकराव कोकाटे यांनी या शेतकऱ्याला म्हटलं.
महत्वाच्या बातम्या :