Manikrao Kokate । राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याप्रकरणी 2 वर्षांची शिक्षा आणि 50 हजार दंड ठोठावला होता. पण या निर्णयाला नाशिक सत्र न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली होती.
मंगळवारी सत्र न्यायालयाच्या निर्णयामध्ये उच्च न्यायालयाने (High Court) हस्तक्षेप करण्यास नकार दिला. उच्च न्यायालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे कोकाटे यांच्यावरील अपात्रतेची कारवाई टळली आहे. अशातच आता त्यांच्या पुन्हा एकदा अडचणी वाढू शकतात.
कारण आता नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Nashik District Central Cooperative Bank) 347 कोटींच्या कर्जवाटपात 182 कोटींची अनियमितता झाल्याने बँकेच्या 25 माजी संचालक किंवा त्यांच्या वारसांना सहकार विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
यामध्ये माणिकराव कोकाटे यांच्यासह खासदार डॉ. शोभा बच्छाव (Shobha Bachhav), आमदार दिलीप बनकर (Dilip Bankar), आमदार डॉ. राहुल आहेर (Rahul Aaher), आमदार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांचा समावेश आहे. यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या पुन्हा एकदा अडचणी वाढल्या आहेत, असे बोलले जात आहे.
Nashik Bank Notice to Manikrao Kokate
येत्या 2 एप्रिल रोजी या प्रकरणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासमोर महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. सहकार विभागाने विद्यमान लोकप्रतिनिधींना नोटीस बजावल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल.
महत्त्वाच्या बातम्या :