Disha Salian । दिशा सालियान मृत्यू प्रकरण (Disha Salian death case) पाच वर्षानंतर पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले आहे. याप्रकरणी दिशाच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली असल्याचा आरोप वडिलांनी केला आहे.
तसेच दिशाच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करावा आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्यासह इतरांना आरोपी करून अटक करावी, असा आदेश देण्याची मागणी सतीश सालियन यांनी याचिकेत केली आहे.
यावर आता राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनीही याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. “खूप गांभीर्याने घेण्यासारखे हे प्रकरण आहे. त्याचे राजकारण करू नये,” असा सल्ला संजय शिरसाट यांनी दिला आहे.
“शरीरावर कोणतीही जखम नसताना दिशाचा मृत्यू कसा होतो? याप्रकरणी तिचे वडील उच्च न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे आता न्यायालय जो आदेश देईल, त्यानुसार कारवाई केली जाईल,” असे संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.
Sanjay Shirsat demand in Disha Salian death case
“जर एखाद्या महिलेवर राजकीय दबाव टाकून अत्याचार होत असेल, तर त्यांना फासावर लटकवा. तसेच जर सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) यांचा मारहाणीत मृत्यू झाला, असा अहवाल असेल, तर याप्रकरणातील दोषींवर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी शिरसाट यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
८ लाख सैनिक असूनही… तुम्ही नालायक आणि निकम्मे आहात; शाहिद आफ्रीदीची मोदी सरकार, लष्करावर टीका