🕒 1 min read
Thane Exit Poll 2026 Result- ठाणे कोणाचं? हा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात सतत विचारला जात होता. आनंद दिघेंचा वारसा सांगणाऱ्या एकनाथ शिंदेंचा की मातोश्रीचा? आता या प्रश्नाचं उत्तर मिळताना दिसत असून ठाण्यात ‘बाळासाहेबांची शिवसेना’ अर्थात शिंदे गटाने मुसंडी मारल्याचं चित्र आहे. ‘जेडीएस’च्या एक्झिट पोलनुसार, ठाणे महानगरपालिकेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला तब्बल ६९ ते ७६ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Thane Exit Poll: Eknath Shinde भारी, ठाकरेंसाठी धोक्याची घंटा?
ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला. इथे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. एक्झिट पोलचे आकडे खरे ठरले, तर शिंदे सेनेने बहुमताचा (६६) जादुई आकडा एकहाती पार केल्याचं स्पष्ट होईल. दुसरीकडे, या शर्यतीत भाजपाला २६ ते ३० जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. पण सर्वात मोठी बातमी म्हणजे, ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं झालेलं कथित ‘पानिपत’. जर हे आकडे निकालात बदलले, तर हा ठाकरेंसाठी मोठा राजकीय धक्का मानला जाईल.
तसं पाहिलं तर, आज दिवसभर राज्यभरातील २९ महानगरपालिकांसाठी झालेलं मतदान चांगलंच गाजलं. मुंबईपासून पुण्यापर्यंत अनेक ठिकाणी मतदार यादीतील घोळ आणि बोगस मतदानाच्या तक्रारींमुळे Election Day वर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले. शाई लवकर पुसली जात असल्याच्या तक्रारींनी तर प्रशासनाच्या कारभारावरच बोट ठेवलं गेलं. तरीही, आता सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. विशेषतः ठाण्यातील या निकालाने Eknath Shinde यांच्या गटात आनंदाचं वातावरण आहे, तर विरोधकांच्या गोटात शांतता पसरली आहे.
JDS Exit Poll for Thane Municipal Corporation (131 seats) are here 🗳️⚡#Thane #MunicipalPolls @jubilant_studio pic.twitter.com/aeoDVMAcfK
— Jubilant Data Studio (@jubilant_studio) January 15, 2026
📌 महत्वाच्या बातम्या
- बोगस मतदानाचा एवढा आरडाओरडा, पण तक्रार फक्त ‘एक’? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीने विरोधकांची बोलती बंद!
- देवेंद्र फडणवीसांचा आदेश धाब्यावर? भाजप नेत्याचे निकालाआधीच ‘विजयी’ पोस्टर्स, राजकीय वर्तुळात चर्चा!
- BMC Exit Poll: ‘मातोश्री’ला धक्का? ठाकरेंचा 25 वर्षांचा गड पडणार? आकडेवारीने उडवली खळबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











