🕒 1 min read
पुणे – निवडणूक म्हटलं की कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा अतिउत्साह हा आलाच, पण पुण्यात जे घडलंय ते पाहून खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही कपाळावर आठ्या पडल्याशिवाय राहणार नाहीत. एकीकडे राज्यभरात २९ महानगरपालिकांसाठी मतदानाची रणधुमाळी नुकतीच संपली आहे, ईव्हीएम मशीन सील झाल्या आहेत, पण निकालाची वाट न पाहताच पुण्यात भाजपच्या एका उमेदवाराने थेट विजयाचे फ्लेक्स झळकवल्याने Mahanagarpalika Election च्या निकालाआधीच मोठा वाद निर्माण झाला आहे.
Mahanagarpalika Election Update 2026
पुण्यातील प्रभाग क्रमांक ३२ चे भाजप उमेदवार सचिन दोडके यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क मतमोजणीच्या आधीच स्वतःला विजयी घोषित करणारे बॅनर्स लावले आहेत. विशेष म्हणजे, अतिउत्साह नडतो हे ओळखून मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत “विजयाचे फ्लेक्स लावू नका” असे आदेश दिले होते. मात्र, राष्ट्रवादीतून नुकतेच भाजपमध्ये आलेले दोडके यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत थेट ‘भावी आमदार’ म्हणून स्वतःचा उल्लेख करणारे बॅनर्स लावले आहेत. यामुळे पक्षातील शिस्त आणि जुन्या-नव्यांचा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे, राज्याच्या इतर भागात मात्र चित्र वेगळं आहे. तब्बल ९ वर्षांनंतर महापालिका निवडणुका होत असूनही मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. मुंबई, सोलापूरसह महत्त्वाच्या शहरांत मतदानाचा टक्का घसरल्याने सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्याही पोटात गोळा आलाय. अनेक ठिकाणी बोगस मतदान, शाई पुसण्याचे प्रकार आणि काही वॉर्डात उघडपणे ‘लक्ष्मीदर्शन’ झाल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता उद्या निकाल आहे, पण त्याआधीच पुण्याच्या या ‘बॅनरबाजी’ने मात्र चांगलाच राजकीय धुरळा उडवून दिलाय.
राज्यातील 29 महापालिकेमध्ये कुठं, किती मतदान?
बृहन्मुंबई महानगरपालिका : 41.08 टक्के
ठाणे : 43.96
कल्याण डोंबिवली : 38.69
नवी मुंबई- 45.51 टक्के
उल्हासनगर : 34.88
भिवंडी निझामपूर – 38.21
मिरा भाईंदर : 38.34
वसई विरार : 45.75
पनवेल : 44.04
नाशिक : 39.64
मालेगाव : 46.18
धुळे : 36.49
जळगाव : 34.27
अहिल्यानगर : 48.49
पुणे – 36.95 टक्के
पिंपरी चिंचवड – 40.50 टक्के
सोलापूर : 40.39
कोल्हापूर : 50.85
सांगली मिरज-कुपवाड : 41.79
छ. संभाजीनगर : 43.67
नांदेड वाघाळा : 42.47
लातूर : 43.58
परभणी : 49.16
अमरावती : 40.62
अकोला : 43.35
नागपूर : 41.23
चंद्रपूर : 38.12
इचलकरंजी : 46.23
जालना : 45.94
📌 महत्वाच्या बातम्या
- BMC Exit Poll: ‘मातोश्री’ला धक्का? ठाकरेंचा 25 वर्षांचा गड पडणार? आकडेवारीने उडवली खळबळ
- “राज्यात बोगस मतदान फक्त एकाच ठिकाणी?”; आयोगाच्या दाव्याने विरोधकही अवाक!
- शाई पुसली जातेय? व्हिडीओ बनवून व्हायरल करणाऱ्यांनो सावधान; आयोगाचा थेट इशारा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











