Share

शाई पुसली जातेय? व्हिडीओ बनवून व्हायरल करणाऱ्यांनो सावधान; आयोगाचा थेट इशारा!

शाई पुसल्याचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर होणार कारवाई; निवडणूक आयोगाचा इशारा. बोगस मतदानाची राज्यात फक्त एकच तक्रार!

Published On: 

Mahapalika Election | Pune Bogus Voting

🕒 1 min read

मुंबई – मतदान केलं, पण बोटावरची शाईच गायब झाली तर? सध्या सोशल मीडियावर असाच काहीसा गोंधळ सुरू आहे. अनेक मतदारांनी आणि राजकीय पक्षांनी शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी केल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. विशेषतः ठाकरे गट आणि मनसेने यावरून आयोगाला धारेवर धरलं होतं. पण आता खबरदार! जर तुम्ही शाई पुसली जात असल्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करत असाल, तर तुमची खैर नाही. निवडणूक आयोगाने अशा लोकांना थेट कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

Election Commission warns legal action over viral ink removal videos

या सर्व वादावर स्पष्टीकरण देण्यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “राज्यात २०११ पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शाईच्या मार्करचा वापर केला जातोय. नियमानुसार नखावर आणि त्वचेवर ३-४ वेळा घासून शाई लावणं बंधनकारक आहे.” मात्र, सध्या शाई पुसल्याचा दावा करणारे व्हिडीओ जाणीवपूर्वक पसरवून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय. हे गैरकृत्य असून असे व्हिडीओ बनवणाऱ्यांवर आणि पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं आयोगाने स्पष्ट केलंय.

दुसरीकडे, बोगस मतदानावरून आयोगाने महत्त्वाची माहिती दिली आहे. “संपूर्ण राज्यातून आतापर्यंत आमच्याकडे बोगस मतदानाची फक्त एकच तक्रार आली आहे आणि त्यावर आम्ही कारवाई केली आहे,” असा दावा वाघमारे यांनी केला. तसंच ‘पाडू’ यंत्राबाबत सुरू असलेल्या चर्चेलाही त्यांनी पूर्णविराम दिला. हे यंत्र नवीन नसून २००४ पासून वापरात आहे आणि ते फक्त EVM चा डिस्प्ले बंद पडल्यास वापरलं जातं. निवडणूक आयोग कुणाचीही बाजू घेत नसून सर्व खातरजमा करूनच प्रक्रिया राबवत असल्याचं त्यांनी सांगितलं.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या