Share

SIR मोहिमेत निष्काळजीपणा भोवला; सोलापुरात बीएलओवर गुन्हा

विशेष मतदार यादी पुनरावलोकन (SIR) मोहिमेतील कामात टाळाटाळ आणि आदेशांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी सोलापुरातील एका बीएलओविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published On: 

SIR Work

सोलापूर : विशेष मतदार यादी पुनरावलोकन मोहिमेतील (SIR Campaign) कामात टाळाटाळ केल्याप्रकरणी सोलापूर महापालिकेतील (Solapur Mahapalika) लिपिक तथा बीएलओ Booth Level Officer (BLO) रविकिरण मधुकर ढाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी त्यांना नोटीस बजावण्यात आली होती, मात्र त्यानंतरही त्यांनी कामाबाबत कोणताही प्रतिसाद दिला नाही.

उत्तर सोलापूर तालुका कृषी अधिकारी तथा सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी रामचंद्र साहेबराव माळी यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार बीएलओविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गणना अर्ज स्वीकारलेच नाहीत

निवडणूक आयोगाने 20 जूनपासून विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत 27 जून रोजी गणना अर्ज स्वीकारून त्यांचे वाटप करण्याच्या सूचना संबंधित बीएलओला देण्यात आल्या होत्या. मात्र त्यांनी अर्ज ताब्यात घेतले नसल्याचे समोर आले. अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्याशी वारंवार दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा मोबाईल बंद असल्याचे आढळले. पर्यवेक्षकांनी त्यांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी जाऊनही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते उपलब्ध झाले नाहीत.

मोहिमेवर परिणाम झाल्याचा आरोप

फिर्यादीनुसार, वारंवार सूचना देऊनही संबंधित कर्मचाऱ्याने कर्तव्यात हलगर्जीपणा केला. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या विशेष पुनरावलोकन मोहिमेवर विपरीत परिणाम झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वी नोटीस बजावूनही खुलासा न केल्याने अखेर संबंधित बीएलओविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 मधील कलम 134 अंतर्गत राष्ट्रीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही