🕒 1 min read
मुंबई – सकाळपासून टीव्हीवर आणि सोशल मीडियावर बोगस मतदानाच्या बातम्यांचा पाऊस पडतोय, नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पण या सगळ्यात निवडणूक आयोगाने (Election Commission) जी माहिती दिली आहे, ती ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. “एवढा आरडाओरडा झाला, पण आमच्याकडे तक्रार आली ती फक्त एक!” असा दावा खुद्द निवडणूक आयुक्तांनीच केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे (Dinesh Waghmare) यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले, “संपूर्ण राज्यातून बोगस मतदानाची चर्चा सुरू असली तरी, आतापर्यंत आमच्याकडे अधिकृतपणे बोगस मतदानाची फक्त एकच तक्रार आली आहे. आणि विशेष म्हणजे, त्या एका तक्रारीवर आम्ही तातडीने कारवाई सुद्धा केली आहे.” आयोगाच्या या दाव्यामुळे विरोधकांच्या आरोपांमधील हवाच निघून गेली आहे की काय? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. आयोगाने हात वर केल्याने आता विरोधक काय पुरावे देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Election Commission claims only single bogus voting complaint received
दुसरीकडे, सध्या ‘पाडू’ (PADU) नावाच्या एका यंत्रावरून संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावरही वाघमारे यांनी स्पष्टीकरण दिलं. “हे यंत्र काही आजचं नाही किंवा नवीन तंत्रज्ञान नाही. हे २००४ पासून वापरात आहे. जेव्हा EVM मशीनचा डिस्प्ले बंद पडतो किंवा तांत्रिक अडचण येते, तेव्हाच केवळ पर्यायी व्यवस्था म्हणून याचा वापर केला जातो,” असं त्यांनी ठणकावून सांगितलं. निवडणूक आयोग कुणाचीही बाजू घेत नसून प्रक्रिया पूर्ण पारदर्शक असल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला. त्यामुळे आता ‘पाडू’वरून सुरू झालेलं राजकारण तापणार की थंड होणार, हे येणारा काळच सांगेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- शाई पुसली जातेय? व्हिडीओ बनवून व्हायरल करणाऱ्यांनो सावधान; आयोगाचा थेट इशारा!
- पुण्यात भाजप नेत्याच्या वॉर्डात राडा; आरोपी येरवड्यात, मग मतदान कुणी केलं?
- मुंबई-पुणेकर ‘फिस’, कोल्हापूरकर ‘सुसाट’; मतदानात कुणी मारली बाजी? आकडे बघून थक्क व्हाल!
- निवडणूक आयुक्त फुकटचा पगार घेतात का? उद्धव ठाकरेंचा संताप; ‘भाईलोग’ म्हणत थेट हल्लाबोल!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











