🕒 1 min read
सकाळपासून टीव्ही लावला की एकच चर्चा… बोगस मतदान! सोशल मीडियावर तर आरोपांचा पाऊस पडतोय. विरोधी पक्ष नेत्यांनी तर निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभं केलंय. पण या सगळ्या गदारोळात निवडणूक आयोगाने (Election Commission) जी आकडेवारी समोर आणली आहे, ती ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. एवढा गदारोळ होऊनही आयोगाकडे बोगस मतदानाची तक्रार आली ती फक्त एक! खुद्द निवडणूक आयुक्तांनीच हा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Maharashtra Election Bogus Voting Truth – Election Commission Clarification
नेमकं सत्य काय? राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, “राज्यात बोगस मतदानाचा नुसता धुरळा उडालाय, पण वस्तुस्थिती वेगळी आहे. आमच्याकडे आतापर्यंत अधिकृतपणे फक्त एकच तक्रार आली आहे. आणि विशेष म्हणजे, त्या एका तक्रारीवर आम्ही तात्काळ ॲक्शन (Action) घेत कारवाई सुद्धा केली आहे.” आयोगाच्या या एका वाक्याने विरोधकांच्या आरोपांमधली हवाच काढून घेतली आहे. आता यावर विरोधक काय पुरावे सादर करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
‘पाडू’ (PADU) प्रकरणाचं गूढ उकललं! दुसरीकडे, ‘पाडू’ मशिनवरून संशयाचं भुत उभं केलं जात होतं. यावरही वाघमारे यांनी रोखठोक उत्तर दिलं. “हे यंत्र आजचं नाही. हे २००४ पासून आपण वापरतोय. जेव्हा ईव्हीएमचा (EVM) डिस्प्ले बंद पडतो, तेव्हाच पर्यायी व्यवस्था म्हणून याचा वापर होतो,” असं त्यांनी ठणकावून सांगितलं. निवडणूक आयोग पूर्णपणे पारदर्शक असल्याचा निर्वाळा त्यांनी दिलाय. त्यामुळे आता ‘पाडू’वरून सुरू झालेलं हे राजकारण तापणार की थंड होणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “राज्यात बोगस मतदान फक्त एकाच ठिकाणी?”; आयोगाच्या दाव्याने विरोधकही अवाक!
- शाई पुसली जातेय? व्हिडीओ बनवून व्हायरल करणाऱ्यांनो सावधान; आयोगाचा थेट इशारा!
- पुण्यात भाजप नेत्याच्या वॉर्डात राडा; आरोपी येरवड्यात, मग मतदान कुणी केलं?
- मुंबई-पुणेकर ‘फिस’, कोल्हापूरकर ‘सुसाट’; मतदानात कुणी मारली बाजी? आकडे बघून थक्क व्हाल!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











