Share

“तिकडे विरोधकांचे बोर्ड लावता अन् इकडे तिकीट मागायला येता?”; अजितदादांचा पारा चढला, भरसभेत म्हणाले…

“विरोधकांचे बोर्ड लावता आणि इकडे तिकीट मागता?” अजित पवारांनी दुहेरी भूमिका घेणाऱ्या कार्यकर्त्यांची भरसभेत शाळा घेतली. झेडपी निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर केला.

Published On: 

Ajit Pawar Warns Party Workers; Announces ZP Election Schedule and Strategy

पुणे – राजकारणात निष्ठा महत्त्वाची असते, पण सध्या ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’ अशी गत काही कार्यकर्त्यांची झालीये. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) तीक्ष्ण नजरेतून हे सुटलेलं नाही. पुण्यात जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजवताना दादांनी डबल गेम खेळणाऱ्या कार्यकर्त्यांची चांगलीच ‘शाळा’ घेतली आहे. अजितदादांचा हा रौद्र अवतार पाहून उपस्थित कार्यकर्तेही काही काळ अवाक झाले.

नेमकं काय घडलं?

बारामतीत राष्ट्रवादी भवनमध्ये कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना अजित पवारांचा जुना आक्रमक अंदाज पाहायला मिळाला. काही इच्छुक उमेदवार विरोधकांचे फ्लेक्स आणि बोर्ड लावतात, मात्र तिकीट मागायला राष्ट्रवादीकडे येतात, हे पाहून दादांचा संयम सुटला. “काहीजण विरोधकांचे बोर्ड लावतात, त्यांना शुभेच्छा देतात… तिकडे शुभेच्छा देता मग मला इकडे तिकीट कशाला मागता? शुभेच्छा तर शुभेच्छाच ठेवा,” अशा अस्सल गावरान भाषेत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावले. एवढंच नाही तर, “ज्याला राजकारण करायचंय त्यांनी कंत्राटदार बनू नका आणि कंत्राटदारांनी राजकारणात येऊ नका,” असा सज्जड दमच त्यांनी दिलाय.

Ajit Pawar ZP Election Schedule and Strategy

एका बाजूला महानगरपालिकेच्या निकालाची उत्सुकता असतानाच, दुसरीकडे अजितदादांनी जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad Election) रणधुमाळीचं नारळ फोडलं आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार, 16 ते 21 जानेवारी दरम्यान उमेदवारी अर्ज भरता येतील. तर 5 फेब्रुवारीला मतदान आणि 7 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगलीसह 12 जिल्हा परिषदांसाठी हा राजकीय थरार रंगणार आहे.

तिकिटांसाठी कुणीही वशिलेबाजी लावू नका, असंही अजितदादांनी स्पष्ट केलंय. “मी कोणालाही शब्द दिलेला नाही किंवा ‘कामाला लागा’ असं सांगितलेलं नाही. 17 जानेवारीला रात्री 12 वाजेपर्यंत मी जागावाटपावर काम करणार आहे. माझ्याकडे सर्वेक्षणाचा अहवाल आला असून, जो कामाचा माणूस असेल आणि ज्याची निवडून येण्याची क्षमता असेल, त्यालाच संधी मिळेल,” असं त्यांनी निक्षून सांगितलंय. त्यामुळे आता बारामतीसह पुण्यात इच्छुकांची धकधक चांगलीच वाढली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही