Share

‘संविधान म्हणतं मतदान करा, आयोग म्हणतं करूनच दाखवा!’; ठाकरेंचा आयोगावर यल्गार, फडणवीसांनाही म्हणाले…

बोटावरील शाई पुसल्यावरून उद्धव ठाकरे संतापले. “संविधान म्हणतं मतदान करा, आयोग म्हणतं करून दाखवा,” अशी टीका करत त्यांनी फडणवीसांच्या ‘चोर कंपनी’ला लक्ष्य केले.

Published On: 

devendra fadnavis, Uddhav Thackeray

मुंबई – मतदानाच्या शाईचा रंग उडाला की लोकशाहीचाच रंग फिका पडलाय? मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत (BMC Election 2026) आज हा प्रश्न प्रत्येक मुंबईकराला पडलाय. मतदानानंतर बोटावरची शाई पुसली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर Uddhav Thackeray यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. “संविधान म्हणतं मतदान करा आणि निवडणूक आयोग म्हणतंय हिंमत असेल तर करूनच दाखवा,” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कारभाराचे वाभाडे काढले आहेत.

आज मुंबईत अनेक ठिकाणी मतदारांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी आल्या. यावर पत्रकार परिषद घेत ठाकरेंनी आयोगाला धारेवर धरले. “निवडणूक आयोग आणि आयुक्त कसला पगार खात आहेत? ९ वर्षांनंतर निवडणुका होत आहेत, तरीही कसलीच सुधारणा नाही. मतदारांच्या याद्यांमध्ये घोळ आहे, महिलांच्या फोटोच्या जागी पुरुषांची नावे आहेत. हा सगळा भोंगळ कारभार संतापजनक आहे,” असा घणाघात त्यांनी केला. शाई पुसली जात नसून “लोकशाहीच पुसली जात आहे,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

या गोंधळावरून उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपवरही (BJP) शेलक्या शब्दांत टीका केली. “देवेंद्र फडणवीस आणि त्यांची ‘चोर कंपनी’ हारली आहे. पराभव समोर दिसत असल्यामुळेच, हारलेल्या मानसिकतेतून त्यांना हे असले प्रकार करावे लागत आहेत,” असा टोला ठाकरेंनी लगावला. जर तुमच्यात हिंमत असती, तर आमच्यासारखे लोकांसमोर जाऊन लढला असतात, असे आव्हानही त्यांनी दिले.

प्रभाग क्रमांक २२६ मधील टपाली मतदानाच्या गोंधळावर आणि गणेश नाईक यांच्या ‘गायब’ असलेल्या मतदान केंद्रावरही त्यांनी बोट ठेवले. “महायुतीकडे आता काहीच कर्तृत्व उरले नाही. गणेश नाईक यांचा ‘टांगा’ फिरून फिरून दुखला आणि घोडा आता फरार झालाय,” अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली. निवडणूक आयोगाचा हा कारभार पाहता, राज्य निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी जोरदार मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही