Share

गुजराती अभिनेत्रीचा राज ठाकरेंना पाठिंबा? अस्खलित मराठीत Video शेअर करत म्हणाली, ‘खऱ्या राजाच्या हातात…’

मतदानाच्या दिवशीच एका गुजराती अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. अस्खलित मराठी बोलत तिने ‘खऱ्या राजा’ला निवडून देण्याचं आवाहन केलंय.

Published On: 

Gujarati Actress Jigna Trivedi Video: राज ठाकरेंना पाठिंबा?

राजकारणात भाषेचे मुद्दे नेहमीच तापलेले असतात, पण जेव्हा एखादी अमराठी व्यक्ती अस्खलित मराठीत बोलून मराठी अस्मितेच्या बाजूने उभी राहते, तेव्हा त्याची चर्चा होणं साहजिकच आहे. आज मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी मतदान होत असतानाच, सोशल मीडियावर एका व्हिडिओने मोठी खळबळ उडवून दिली आहे. सुप्रसिद्ध गुजराती अभिनेत्री जिगना त्रिवेदी (Jigna Trivedi) हिने चक्क शुद्ध मराठीत संवाद साधत अप्रत्यक्षपणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पाठिंबा दर्शवला आहे.

Gujarati Actress Jigna Trivedi Video

जिगना त्रिवेदीने आपल्या व्हिडिओमध्ये मुंबईकरांना कडक शब्दांत सावध केलं आहे. ती म्हणते, “कपडे घेताना किंवा बाईने दोन दिवस भांडी घासली नाहीत तर आपण तक्रार करतो, मग पाच वर्षांसाठी आपलं राज्य कोणाच्या हातात द्यायचं, याचा विचार गांभीर्याने करा.” मुंबईच्या विकासावर बोलताना तिने परखड मत मांडलं. “केवळ मुंबई विकसित करून चालणार नाही. आपल्याला असा विकास नकोय जिथे आपला श्वास गुदमरेल,” असं म्हणत तिने मुंबईवर वाढणाऱ्या ताणावर बोट ठेवलं आहे.

या व्हिडिओच्या शेवटी जिगना जे बोलली, त्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. ती म्हणाली, “आता आपला महाराष्ट्र ‘खऱ्या राजा’च्या हातात देण्याची संधी आहे, ही संधी चुकवू नका.” तिचा हा रोख स्पष्टपणे राज ठाकरेंकडे असल्याचं बोललं जातंय. एकीकडे राज ठाकरे मुंबईला गुजरातशी जोडण्याच्या डावावर टीका करत असताना, एका गुजराती अभिनेत्रीनेच त्यांची बाजू उचलून धरल्याने हा ‘टर्निंग पॉईंट’ मानला जात आहे.

निवडणूक प्रचारात राज ठाकरेंनी ‘बाहेरच्यांना मुंबईचे प्रश्न कळत नाहीत’ अशी भूमिका घेतली होती. मात्र, जिगना त्रिवेदीच्या या व्हिडिओमुळे मराठी आणि अमराठी मतदारांवर काय परिणाम होतो आणि मतपेटीतून कोणाला कौल मिळतो, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल. तोपर्यंत “चुकाल तर सर्वच मुकाल,” हा तिचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही