Share

अजित पवारांचा महेश लांडगेंना इशारा; ‘त्या’ डावाने फिरवून फेकून दिला नाही तर पवारांची औलाद नाही!

अजित पवारांनी महेश लांडगेंना ‘नासका आंबा’ म्हणत जोरदार टीका केली. “भारंदाज डाव टाकून फेकून देईन,” असे आव्हान देत त्यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले.

Published On: 

Mahesh Landge vs Ajit Pawar

पुणे – राजकारणात शब्दांचे वार आणि पलटवार नवीन नाहीत, पण जेव्हा अजितदादांचा पारा चढतो, तेव्हा समोरच्याची काही खैर नसते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय! पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रणांगणात Ajit Pawar यांनी भाजप आमदार महेश लांडगे यांचा अक्षरशः ‘समाचार’ घेतला आहे. भोसरीतील जाहीर सभेत बोलताना दादांनी लांडगेंवर जहरी टीका केली की, उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. “तो नासका आंबा आहे, वेळीच बाजूला केला नाही तर अख्खी पेटी नासवेल,” अशा शब्दांत दादांनी हल्लाबोल केला.

अजित पवार म्हणाले, “महेश लांडगे नासका आंबा आहे. भारंदाज डाव टाकून यांना फिरवून फिरवून फेकून नाही दिला, तर पवारांची औलाद सांगणार नाही.” मी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा अध्यक्ष राहिलोय, मला ‘घुटना चित’ कसं करायचं हे चांगलंच ठाऊक आहे, असा सज्जड दमच त्यांनी भरला. जकात नाक्यावर यांचे काय उद्योग चालायचे? असा सवाल करत अजितदादांनी लांडगेंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. “काय होतास तू आणि आता काय झालास तू?” असं विचारत त्यांनी लांडगेंच्या संपत्तीवर बोट ठेवलं.

शहरात युपी-बिहारसारखी परिस्थिती झाली असल्याचा गंभीर आरोपही पवारांनी केला. “पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी आलेले ४० हजार कोटी कुठे गेले? यात कुणाची प्रॉपर्टी वाढली? राजगुरूनगरमध्ये जमिनी कुणी घेतल्या?” याची सगळी कुंडलीच आपल्याकडे असल्याचं दादांनी सांगितलं. स्वतःच्या प्लॉटवर घर बांधायचं म्हटलं तरी ‘आका’च्या (Mahesh Landge) धमक्या येतात, खंडण्या उकळल्या जातात. या ‘भ्रष्टाचाराच्या राक्षसाला’ संपवण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं.

दरम्यान, भाजपच्या (BJP) जाहीरनाम्याचीही अजित पवारांनी खिल्ली उडवली. भाजपने ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवासाचं आश्वासन दिलं आहे. यावर दादा म्हणाले, “अरे ७५ वयाचे किती ज्येष्ठ प्रवास करतात? तोपर्यंत काय लोकांनी झुरुन-झुरुन वाट बघायची का?” दुसरीकडे, स्वतःच्या मोफत मेट्रोच्या घोषणेसाठी कॅबिनेटच्या मान्यतेची गरज नसल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही