🕒 1 min read
मुंबई– आज मतदानाचा टक्का वाढेल की घटेल हे संध्याकाळी समजेलच, पण त्याआधीच राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलंय! मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान तैनात केलेल्या ‘भगवा गार्ड’वरून आता मुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि ठाकरे बंधूंमध्ये जोरदार ‘सामना’ रंगला आहे. फडणवीसांनी उद्धव आणि राज ठाकरेंना डिवचताना अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे.
बोगस मतदान रोखण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत मुंबईतील अनेक मतदान केंद्राबाहेर ‘भगवा गार्ड’ची फौज उभी केली आहे. दुबार मतदारांवर हे गार्ड करडी नजर ठेवून आहेत. मात्र, या ‘भगवा गार्ड’मुळे मुंबईत तणाव निर्माण होत असल्याचा आरोप करत फडणवीसांचा पारा चढला आहे. त्यांनी ठाकरे बंधूंना थेट आव्हान देत, त्यांच्या राजकीय ताकदीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “हे काय मुंबईत दहशत निर्माण करणार? यांच्यात आता ती क्षमता तरी उरली आहे का?” असे फडणवीस म्हणाले आहेत.
फडणवीसांनी इशारा देताना स्पष्ट केलंय की, जर कुणी मुंबईत दादागिरी किंवा दहशत करण्याचा प्रयत्न केला, तर “पोलीस त्यांना ठोकून काढतील.” त्यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की, हे ‘भगवा गार्ड’ फक्त ठराविक भागातच का सक्रिय आहेत? मालवणीसारख्या भागात ते का दिसत नाहीत? त्यांना ‘सिलेक्टिव्ह’ दहशत निर्माण करायची आहे का? असा रोखठोक सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मतदारांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचा गंभीर आरोप केला होता. याचीही फडणवीसांनी खिल्ली उडवली. “निवडणुकांबाबत सगळ्या गोष्टी निवडणूक आयोग ठरवतं. याआधीही मार्करचा वापर झाला आहे. जर काही न शंका असेल तर निवडणूक आयोगाने दुसऱ्या पेनचा वापर केला पाहिजे. मी तर म्हणतो की, ऑईल पेंटचा वापर केला पाहिजे. मात्र निवडणुकीशी संबंधित संस्थानवर अशा पद्धतीने संशय निर्माण करणे योग्य नाही, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. माझ्या हातावरील मार्कर पुसून दाखवा,” असे ओपन चॅलेंजच फडणवीसांनी दिले आहे. एकंदरीत, Election च्या दिवशी मुंबईतल्या या हायव्होल्टेज ड्रामाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘घरात बसून चालणार नाही, बटण दाबावंच लागेल’; मतदानानंतर सचिन तेंडुलकरचं मुंबईकरांना आवाहन!
- ‘ही सुट्टी समजून लोळत पडू नका’; पुण्याहून ३ तास प्रवास करून नाना पाटेकर मुंबईत, मतदारांना आवाहन
- ‘मोठी लढाई लढू, मातीसाठी रं गड्या…’; तेजस्विनी पंडितची ‘ती’ पोस्ट चर्चेत, राज ठाकरेंना दिला उघड पाठिंबा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











